शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : राज्याच्या महसूल विभागाने आपल्या संकेतस्थळावर ५२ बँकांशी करार केला आहे. आता या बँकांतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : राज्याच्या महसूल विभागाने आपल्या संकेतस्थळावर ५२ बँकांशी करार केला आहे. आता या बँकांतून डिजिटल स्वाक्षरीने सातबारा उतारा, आठ ‘अ’ व फेरफार ऑनलाईन पद्धतीने बँकेत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांकडे सातबारा व आठ ‘अ’ मागू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे एका निवदेनाद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत सर्व बँका, खासगी बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा या करारात समावेश आहे. सध्या २०२१ खरीप पीककर्ज वाटप चालू आहे. त्यासाठी तलाठ्याची स्वाक्षरी असलेला सातबारा, आठ ‘अ’ व फेरफारची मागणी बँका शेतकऱ्यांकडे करीत आहेत. बँकेला संकेतस्थळावर हे सर्व शासनाने उपलब्ध करून दिले आहे. तरी बँका शेतकऱ्यांना तलाठ्याकडे असे उतारे आणण्यास भाग पाडत आहेत. एकतर तलाठी मुख्यालयी कधीच नसतात. त्यासाठी त्यांनी खासगी सहाय्यक ठेवले आहेत. खासगी सहाय्यक शेतकऱ्यांकडून तोंड पाहून मनमानी रक्कम घेतात. यात शेतकरी भरडला जात आहे. काहींना फेरफारसाठी तहसीलला जावे लागते. तरी बँकांना दिलेल्या संकेतस्थळावरून कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा. याबाबत बँकांना सक्त सूचना करण्यात यावी. यामुळे महसूल विभागाचा कामाचा ताण कमी होईल. शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल. तरी आपण तत्काळ कार्यवाही करावी. नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.