शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून आलेल्या वाहक, चालकांचा कोरोना तपासणी अहवाल प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

माजलगाव : दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील बेस्टला सेवा देण्यासाठी माजलगाव आगारातील २२ चालक, वाहक पाठवले होते. रविवारी माजलगावात आल्यानंतर त्या ...

माजलगाव : दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील बेस्टला सेवा देण्यासाठी माजलगाव आगारातील २२ चालक, वाहक पाठवले होते. रविवारी माजलगावात आल्यानंतर त्या वाहक-चालकांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. परंतु त्याचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत असताना या आगार व्यवस्थापनाकडून त्या वाहक-चालकांना कर्तव्यावर जाण्याची सक्ती केली जात आहे. एसटी महामंडळाचे हे धोरण माजलगावात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, असे चित्र पहावयास मिळत आहे.

माजलगाव आगाराचे वाहक-चालक मुंबईतल्या बेस्ट बसला सेवा देण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून जात आहेत. पंधरा दिवसाला २२ वाहक-चालक नियुक्ती वेळापत्रकानुसार जातात. त्याचप्रमाणे १० एप्रिल रोजी हे वाहक-चालक गेलेले होते. त्या ठिकाणी कर्तव्य पार पडल्यानंतर ते मुंबई येथून परतले. परत आल्यावर रविवारी त्यांना कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी येणार होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्या वाहक-चालकांना नवीन येणाऱ्या आधुनिक बसच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता येथील आगार प्रमुखांनी त्यांना कार्यावर पाठवले. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची वाढती संख्या आणि त्या ठिकाणी कर्तव्य करून आलेल्या २२ वाहक - चालकांचा दोन आठवडे त्या ठिकाणी झालेला वावर यामुळे दुर्दैवाने त्यामधील अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघू शकतात.

धाेरणच ठरेल कारण

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून नवीन येणाऱ्या शिवशाही बसच्या प्रशिक्षणासाठी मुंबईहून आलेल्या २२ वाहक, चालकांसोबत इतर १६ वाहक, चालक प्रशिक्षण घेत आहेत. यातील बावीस चालक-वाहकांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा न पाहता माजलगाव आगाराचा कारभार महामारी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला कुटुंबाची भीती

आम्ही मुंबईहून बेस्टचे कर्तव्य बजावून आलो असून, आम्ही कोरोना टेस्ट केलेली आहे. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच आम्हाला प्रशिक्षणाला पाठविण्यात येत आहे. आम्ही प्रशिक्षणाला जाणार असून, आमच्यामुळे बाहेरील नागरिकांची व आमच्या कुटुंबातील सदस्यांची आम्हाला भीती वाटत असल्याचे हे वाहक - चालक सांगत होते. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे वातावरण दिसत होते.

त्या चालक-वाहकांचा रिपोर्ट निगेटिव्हच

मुंबईवरून बेस्टचे कर्तव्य बजावून आलेल्या त्या २२ वाहक, चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना अहवाल अद्याप हातात पडला नाही. परंतु आम्ही कोविड सेंटरवरून माहिती घेतली आहे. नमुने पाठविलेले अहवाल निगेटिव्हच असल्याचे समजल्याने आम्ही त्या वाहक, चालकांना शिवशाही प्रशिक्षणासाठी पाठविले आहे.

- दत्तात्रय काळम पाटील, आगार प्रमुख