शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

धारुरच्या घाटातील थरार धारूर : मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे, असा बहाणा करून एका तरुणाला गोड बोलून जीपमध्ये ...

धारुरच्या घाटातील थरार

धारूर : मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे, असा बहाणा करून एका तरुणाला गोड बोलून जीपमध्ये बसविले व त्यानंतर त्याला पोत्यात टाकून धारुरच्या घाटात नेऊन पेट्रोल ओतून जिवंत पेटविण्यात आले. या घटनेत तरुणाचा चेहरा गंभीररित्या भाजला आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ही थरारक घटना घडली. याप्रकरणी दिंद्रूड ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

कृष्णा अर्जुन गायकवाड (१९, रा. नाकलगाव, ता. माजलगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता तो गावातील किराणा दुकानासमोर थांबला होता. त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड (रा. मंगरुळ क्र. २, ता. माजलगाव) याचा फोन आला. आपल्याला मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तू रस्त्यावर ये, असे त्याने सांगितले. आदिनाथच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कृष्णा मुख्य रस्त्यावर आला. काही वेळातच आदिनाथ तेथे पांढऱ्या वाहनातून पोहोचला. त्यावेळी आदिनाथ व त्याच्यासोबत असणाऱ्या इतर तीन जणांनी कृष्णाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यास पोत्यात टाकून चारचाकी वाहनातून सोनिमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात नेले. तेथे गाडीतून खाली उतरवून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले. त्यानंतर ते चौघेही तेथून निघून गेले.

दरम्यान, जखमी कृष्णाला स्थानिकांनी वस्तीवर नेले. तेथे कृष्णाच्या मोबाईलवरून नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर नातेवाईक तेथे पोहोचले. जखमी कृष्णाला तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड व इतर तीन अनोळखींवर दिंद्रूड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत.

.....

कारण गुलदस्त्यात

दरम्यान, कृष्णा गायकवाड व आदिनाथ गायकवाड हे मित्र आहेत. मात्र, आदिनाथने कृष्णाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न का केला, याचे गूढ कायम आहे. सध्या चारही आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेनंतर गुन्ह्यामागचा हेतू समोर येईल, असे सहायक निरीक्षक प्रभा पुंढगे यांनी सांगितले.

......

230921\img-20210923-wa0084.jpg

संबृःधीत युवक