कामखेडा येथील रहिवासी व फिर्यादी सुरेश पांडुरंग पवार हे त्यांच्या शेतातील काम करून ट्रॅक्टर घेऊन पवार तांड्यावरील घरी निघाले होते. यावेळी त्यांच्या ट्रॅक्टरवर अनिल पवार याने दगड मारला, ‘तू ट्रॅक्टरवर दगड का मारला’ असा जाब सुरेश यांनी विचारला असता, जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाठीमागून आलेल्या अंबादास पवार याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून सुरेश यांचा भाऊ, चुलत भाऊ व सासू भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांनादेखील मारहाण करण्यात आली. या भांडणात सुरेश पवार, संतोष पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी सुरेश यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल लक्ष्मण पवार, प्रल्हाद पवार, लक्ष्मण पवार, आबासाहेब पवार, बाबासाहेब पवार, सुशांक पवार, गुलाब पवार, सुनील पवार (सर्व रा. पवार तांडा कामखेडा ता.बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रोठे हे करत आहेत. दरम्यान त्यांनी कामखेडा येथील घटनास्थळावर २४ मे रोजी पंचनामादेखील केला आहे.
===Photopath===
240521\24_2_bed_21_24052021_14.jpeg
===Caption===
कामखेडा येथील पवार तांड्यावरील घटनास्थळावर पंचनामा करताना पोलीस अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ दिसत आहेत