शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

पावणेदोन कोटी रुपये थकविल्याने आष्टीचा पाणीपुरवठा, पथदिव्यांची वीज खंडित - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

दिवसेंदिवस आष्टी नगरपंचायतचा आर्थिक व्यवहार ढासळत असून, त्याचा परिणाम शहरवासीयांना काल अनुभवास आला. शहरात असणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठाच महावितरण ...

दिवसेंदिवस आष्टी नगरपंचायतचा आर्थिक व्यवहार ढासळत असून, त्याचा परिणाम शहरवासीयांना काल अनुभवास आला.

शहरात असणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठाच महावितरण विभागाने थकीत बिलामुळे खंडित केला. याबाबत महावितरणला थकीत बिलाची रक्कम विचारली असता ती तब्बल एक कोटी ६९ लाखांच्या घरात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईमुळे आष्टीकरांना नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. एकतर दोन दिवसांपूर्वी शहरात रात्रीच शिक्षकाचे घर फोडले. सर्वत्र अंधार असल्यामुळे चोरही या संधीचा फायदा घेतात. गेल्या महिनाभरापासून आष्टी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे ह्या रजेवरही गेल्या नाहीत आणि कार्यालयातही आल्या नाहीत. त्यामुळे नगर पंचायतचा कारभार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा झाला आहे, असे म्हणण्याची वेळ आष्टीकरांवर आली आहे. याबाबत नगर पंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांना फोन लावला असता त्यांनी फोन न घेतल्यामुळे बाजू कळू शकली नाही.

शहरातील नगरपंचायतकडे महावितरणचे पथदिव्यांची थकीत बाकी ही जवळपास एक कोटी ५६ लाखांच्या घरात आहे तसेच आष्टी शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विद्युत पंपाची बाकी जवळपास १३ लाखांपेक्षा जास्त असल्याने विद्युत पुरवठा आम्हाला खंडित करावा लागला.

-दत्तात्रय दसपुते

(सहाय्यक अभियंता, महावितरण, आष्टी)

याबाबत मला काहीही माहीत नाही. मी जरी कार्यालयीन प्रमुख असलो तरी आर्थिक व्यवहार माझ्याकडे नाहीत. मला कसलीही प्रतिक्रिया विचारू नका आणि मी काही प्रतिक्रिया देणार नाही.

-के. टी. सांवत, कार्यालयीन प्रमुख, नगरपंचायत, आष्टी

गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आम्ही नगर पंचायतीला नोटीस देत असून, तरी याबाबत नगर पंचायत कार्यालय कसलीच दखल घेत नसल्याने चार दिवसांपूर्वी आम्ही चौथी नोटीस दिली होती. त्यांनी थकबाकी न भरल्याने आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पाणीपुरवठा व सार्वजनिक दिवाबत्तीचा विद्युत पुरवठा खंडित केला.

- शिवाजी गोरे, लाइनमन, आष्टी