शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नावावर रोखली कमान, वाळू उपशाला मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथे वाळूमाफियांनी आता नवीन शक्कल लढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांत इतरांना प्रवेशबंदी करून आतमध्ये ...

माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथे वाळूमाफियांनी आता नवीन शक्कल लढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांत इतरांना प्रवेशबंदी करून आतमध्ये दररोज दिवस-रात्र गोदावरी नदीपात्रातून प्रचंड वाळू उपसा करण्यात येत आहे. इकडे गावात नवागतास प्रवेशबंदी केल्याने कोरोना रुग्ण प्रमाण शून्य असल्याचे सांगून काही लोक पाठ थोपटून घेत असले तरी दुसरीकडे कोरोनाच्या नावावर वाळू चोरी होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर संगनमताने डल्ला मारण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

गंगामसला येथील गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात प्रचंड वाळू असल्याने चोरट्या वाळू वाहतुकीच्या धंद्यात काही लोक उतरले आहेत. दररोज दिवस-रात्र तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याशी संगनमत करून किमान १५ ट्रॅक्टरमध्ये वाळू उपसा करून त्याची वाहतूक करून विक्री केली जाते. असा हा गोरखधंदा सर्रासपणे सुरू असताना गावात कोणी येत असेल तर त्याची माहिती म्हणून पाथरी फाटा, पवारवाडी, मोठेवाडी कॉर्नर, छोटेवाडी, मोगरा फाटा, ३३ केव्ही केंद्र, खरात आडगाव फाटा, मोठेवाडी कॅनॉल व गावातील प्रवेश कमानीजवळ आदी ठिकाणी माफियांनी खबरे ठेवले आहेत. हे खबरे अनोळखी कोणी येत असेल किंवा वाहन येत असेल तर माफियांना माहिती पुरवतात. राष्ट्रीय महामार्गावरील गावाच्या प्रवेशद्वाराला एक कमान आहे. तेथूनच गावात प्रवेश मिळतो. तेथे दररोज रात्री काही लोक बसतात. माफियांनी अधिकाऱ्यांना संगनमताने मॅनेज केले असून त्यांच्या आर्थिक तडजोडीबरोबर त्यांच्या चालकाला सुद्धा टीप देण्यासाठी रक्कम दिली जात असल्याचे बोलले जाते. येथील वाळूमाफियांचा कर्ता-करविता एक ‘काका’ आहे, तोच सर्व खबऱ्यांचे, अधिकारी, पोलीस यांच्याबरोबर कमानीजवळील एका हॉटेलमध्ये बसून मधुर संबंध साधून असतो. गावचा तलाठीदेखील नदीपात्रात खड्डे करून वाळू चोरी होत असताना गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माफियांना अभय

मागील कित्येक महिन्यांपासून वाळूची चोरी सुरू असतानाही पोलीस किंवा महसूल पथकाकडून या गावात एकही गुन्हा किंवा दंडाची कारवाई झालेली नाही. एकीकडे कवडगावथडी येथे जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक अर्ध्या रात्री मोठी कारवाई करते. मात्र, या ठिकाणी कारवाई होत नाही, त्यावरून या माफियांना मोठे अभय मिळते, असे दिसून येते.

कारवाईसाठी पथके नेमली

आम्ही गोदावरी नदीपात्रातील गावांमध्ये अवैधरीत्या होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी पथकांची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामार्फत वाळू चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ---वैशाली पाटील, तहसीलदार

===Photopath===

230521\purusttam karva_img-20210523-wa0036_14.jpg