शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारातून कुठल्याही संकटावर मात करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

धारूर : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सकारात्मक व चांगल्या विचारांतून कुठल्याही संकटावर मात करता येते, असे प्रतिपादन ...

धारूर : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सकारात्मक व चांगल्या विचारांतून कुठल्याही संकटावर मात करता येते, असे प्रतिपादन प्रकाश महाराज साठे यांनी केले. येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर कोरोना रुग्णांसाठी आयोजित कीर्तन सेवेत त्यांनी प्रतिपादन केले.

कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे मोफत कीर्तन करतात. धारूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी साठे महाराज यांची आठवी कीर्तन सेवा होती. आपल्या कीर्तन सेवेत त्यांनी रुग्णांना मानसिकदृष्ट्या खंबीर करणारे विचार मांडले. राष्ट्रसंत तुकारामांचा अंभग कीर्तनासाठी घेतला. साठे म्हणाले, कोरोना संकट ही जागतिक महामारी आहे. या काळात विचार सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. आजार हा विचारांवर अवलंबून असतो. चांगले विचार ठेवल्यास सर्व परिस्थितीवर मात करता येते, असे ते म्हणाले. कीर्तनामध्ये चांगल्या विचाराचे टाॅनिक मिळते. जसे आपण विचार करतो, तसे घडत जाते. त्यामुळे चांगले विचार सतत करा. या कोरोना महामारीने कुणाचे कुणी नाही हे पुन्हा एकदा दाखविले आहे. संतांचे अभंग बरेच काही शिकवतात. त्यामुळे संतविचारांच्या मार्गावर चालत रहा, सकारात्मक विचार करा. यातूनच आपण या संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी दिला. साठे महाराज यांनी कीर्तन सेवेतून प्रबाेधनाबरोबरच श्रोत्यांचे मनोरंजन केले. कीर्तनसेवा यशस्वी करण्यासाठी नितीन शिनगारे, हर्षवर्धन अंडील, सुहास तपसे, ऋषीकेश ढगे, सुरेश शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. सर्व कोरोना रुग्णांनी या कीर्तनाचा लाभ घेतला.