शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई नगर परिषद प्लास्टिकमुक्तीपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईत एकीकडे पर्यावरणप्रेमी प्लास्टिकमुक्तीसाठी सरसावले असून नदीच्या पात्रात जाऊन प्लास्टिक गोळा ...

शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाईत एकीकडे पर्यावरणप्रेमी प्लास्टिकमुक्तीसाठी सरसावले असून नदीच्या पात्रात जाऊन प्लास्टिक गोळा करतात. तर, दुसरीकडे शहरात अनेक लहान, मोठे व्यापारी सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरीबॅग यांची विक्री छुप्या पद्धतीने सर्रास सुरू आहे. नगर परिषद प्रशासन प्लास्टिकमुक्तीपासून दूर असल्याने प्लास्टिकचा वापर हमखास सुरूच राहिला आहे.

राज्य सरकारने मार्च २०१८ मध्ये प्लास्टिकबंदीचा आदेश काढल्यानंतर विविध नगर परिषदांनी धडाक्यात कारवाईला सुरुवात केली. या कारवाईच्या भीतीमुळे लोकही प्लास्टिकच्या पिशव्या नेणे टाळू लागले. विक्रेतेही घरून कापडी पिशवी आणण्याचा आग्रह धरू लागले. याचा प्लास्टिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला. बंदीनंतर काही दिवसांनी सरकारने विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक बंदीतून वगळल्याने काहीसा संभ्रमही निर्माण झाला. प्लास्टिकबंदीचा आढावा घेतला असता आजही प्लास्टिकबंदीला १०० टक्के यश मिळाल्याचे दिसत नाही. काही भागात नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावली आहे. पण, कारवाईचे भय संपल्यामुळे प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच उरली आहे. प्लास्टिक, थर्माकोलच्या वापरात पूर्वीच्या तुलनेत घट झाली. मात्र, ही बंदी पूर्णत: अमलात आली नाही. भाजीबाजार, फळांचे गाडे या ठिकाणी आजही सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू आहे.

कारवाई थंडावताच वाढतो वापर

प्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर हा स्वच्छता, प्रदूषणासह अनेक नागरी समस्यांच्या दृष्टीने आव्हान ठरले होते. पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास वापर थांबतो. कारवाई थंडावली की पुन्हा प्लास्टिकचा वापर ‘जैसे थे’ सुरू होतो.

जलस्रोतांना विळखा कायम

अंबाजोगाई शहरात असणा-या जयवंती व वाण नदीत शहरवासीयांनी वापरलेले प्लास्टिक वाहून येते. या नदीत चार-चार थर प्लास्टिकचे झाले आहेत. पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येऊन जेव्हा प्लास्टिक निर्मूलनाचा उपक्रम हाती घेतला, तेव्हा शेकडो हातही या कामी कमी पडू लागले, अशी स्थिती झाली आहे. जलस्रोतांमध्ये जर प्लास्टिक तसेच राहिले तर भविष्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण राहणार आहे. याचा मोठा फटका मानवी जीवनाला निमूटपणे सहन करावा लागणार आहे.

....

कठोर कारवाई करणार

अंबाजोगाई शहरात प्लास्टिकचा वापर छुप्या पद्धतीने करणा-या व्यापा-यांवर कारवाई केली जाईल. यापूर्वीही नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी प्लास्टिकबंदी मोहीम राबविली आहे. आता विशेष पथक नेमण्यात येणार असून बंदी झुगारणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

- अशोक साबळे,

मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई