शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

बीड : जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या पथकाने केज तालुक्यातील सुर्डी व सोने सांगवी शिवारात बुधवारी दुपारी कारवाई ...

बीड : जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या पथकाने केज तालुक्यातील सुर्डी व सोने सांगवी शिवारात बुधवारी दुपारी कारवाई केली. यावेळी ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त करण्यात आल्या. तर, एक ते दीड हजार ब्रास मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी चार टिप्पर व एक पोकलेन ताब्यात घेण्यात आले आहे.

अंबाजोगाई विभागाच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्याकडे केज तालुक्यात मांजरा नदीतून वाळू ‌उपसा व मुरुम उत्खनन केले जात आहे. तहसीलदार दुलाजी मेंडके यांना माहिती असताना देखील कारवाई केली जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंजुषा मिसकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा नायब तहसीलदार टी.एस आरसूळ यांना पथकासह छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी पथकातील कर्मचारी हर्षद कांबळे, नितीन जोगदंड, संदीप खरुद यांना सोबत घेऊन केज तालुक्यातील सुर्डी येथे छापा टाकला. यावेळी मांजरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाटी मोठ्या सक्शन पंपासह बोटींचा वापर केला जात असल्याचे समोर आले. या दोन्ही बोटी प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तर, केज ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान सुर्डी व सोनेसांगवी शिवारात अवैधरित्या मुरुम उत्खनन वाहतूक सुरु असल्याची माहिती पथकाला मिळताच त्याठिकाणी कारवाई करून ४ टिप्पर व १ पोकलेज जप्त केले.

===Photopath===

210421\21_2_bed_22_21042021_14.jpg

===Caption===

सुर्डी येथील मांजरा नदीपात्रातून बोटीच्या मदतीने वाळू उपसा करणऱ्या बोटी पाण्यातून बाहेर काढता अधिकारी कर्मचारी