शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धारूर तालुक्यात १३ दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

धारूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत ...

धारूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात दौरा करून एकूण १३ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली तसेच विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांकडूनही दंड वसूल केला.

धारूर तालुक्यामध्ये भोपा, तेलगाव, देवदहिफळ, संगम, मुंगी, फकीर जवळा, चोंरबा अंबेवडगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेचे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी तसेच धारूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे यांनी पथकासह भेट दिली.

तेलगाव येथे कोरोना व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ दुकानांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे नऊ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अंबेवडगाव येथे तीन दुकानांवर कारवाई करून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला, तर चोंराबा येथेही एका दुकानावर कारवाई करत एक हजार रुपयांचा दंड आकारला. एकूण १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्थांवर प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा ग्रामपंचायतनिहाय असल्याने समजू शकला नाही. पथकात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अनिल चौरे, सीसीचे साहाय्यक अशोक शिंदे, ग्रामसेवक शंकर हेडगिरे आदींचा समावेश होता.

===Photopath===

230521\img-20210522-wa0177_14.jpg