शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम क्लोनिंगप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST

बीड : एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे खात्यातील पैसे काढणारी परराज्यांतील टोळी बीड सायबर विभागाने ९ फेब्रुवारीला ताब्यात घेतली. ...

बीड : एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे खात्यातील पैसे काढणारी परराज्यांतील टोळी बीड सायबर विभागाने ९ फेब्रुवारीला ताब्यात घेतली. त्यांना ११ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, आरोपींना १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच तपासामध्ये राज्यातील इतर गुन्हेदेखील उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

बिरू राजेंद्र पांडे (रा. मायापूर, जि. गया), सतीशकुमार नंदलाल प्रसाद (रा. बडकी, जि. गया), मोहम्मद असद नसीम खान (रा. मंजोलीगाव, जि. गया, ह. मु नालासोपारा मुंबई), मोहम्मद जावेद जब्बार खान (रा. मंजोलीगाव, जि. गया) अशी आरोपींची नावे आहेत. एटीएम कार्डमधून पैसे काढून घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास बीड सायबर विभाग करत होते. त्यांनी तांत्रिक पुराव्यावरून आरोपी निष्पन्न केले होते. मात्र, बिहारमध्ये जाऊन आरोपी अटक करणे कोरोनामुळे शक्य नव्हते, मात्र, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. यादरम्यान आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे एटीएम क्लोनिंग करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले तसेच त्यांनी गुन्हादेखील कबूल केला. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सायबर विभागाचे प्रमुख पोनि रवींद्र गायकवाड हे करत आहेत.

बीडमधील सर्व लॉजची केली होती तपासणी

आरोपी मागील वर्षी डिसेंबर २०२० रोजी हे आरोपी बीडमध्ये आले होते. त्यांनी शहरातील व इतर ठिकाणच्या काही भागांत एटीएम मशीनला क्लोनिंग करणारे यंत्र बसवून एटीएमची माहिती मिळविली होती तसेच ज्या एटीएम मशीनला क्लोनिंग यंत्र बसविले आहे. त्याठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मागे उभा राहून त्याचा पिननंबर पाहिला जात होता. त्यानंतर बनावट एटीम कार्ड तयार करून खात्यातील रक्कम लंपास केली जात होती, अशी माहिती सायबर विभागाने दिली.

राज्यातील इतर गुन्हे होतील उघड

राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतर कोणत्या शहरात असा गैरप्रकार करून पैसे लांबविले आहेत याचा तपास बीड पोलीस करत आहेत.