बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १४३, आष्टी १२३, बीड १४१, धारुर २९, गेवराई ६०, केज ७१, माजलगाव ७३, परळी ५९, पाटोदा २५, शिरुर २६ आणि वडवणी तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे. तसेच ३३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान शनिवारी जिल्ह्यातील ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात पवारवाडी (ता.माजलगाव) येथील १८ वर्षीय पुरुष, केज शहरातील धारुर रोड भागातील ३५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ७९ वर्षीय पुरुष, हौसींग सोसायटी येथील ७१ वर्षीय पुरुष, आपेगाव (ता.अंबाजोगाई) येथील ५६ वर्षीय महिला, सिरसाळा (ता.परळी) येथील ४५ वर्षीय पुरुष, बीड शहरातील शिक्षक कॉलनीतील ७१ वर्षीय पुरुष व लोखंडी सावरगाव (ता.अंबाजोगाई) येथील ७८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या मृत्यूमध्ये जेष्ठांची संख्या अधिक असायची, मात्र शनिवारी दोन तरुणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाचा विळखा घट्ट होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३१ हजार २७८ झाली आहे. पैकी २७ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले असून ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती जि.प.चे सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.