शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

एसबीआयलाच ४ लाख ४० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

बीड : शहर पोलीस ठाणे हद्दीतील जालना रोड भागातील एसबीआय बँकेच्या ओकेआय या कंपनीच्या एडीडब्ल्यूएम मशीनमधून आयडीएफसी बँक खात्याच्या ...

बीड : शहर पोलीस ठाणे हद्दीतील जालना रोड भागातील एसबीआय बँकेच्या ओकेआय या कंपनीच्या एडीडब्ल्यूएम मशीनमधून आयडीएफसी बँक खात्याच्या ग्राहकाने एसबीआयचे ४ लाख ४० हजार ५५० रुपये वळते करून घेतले. हा प्रकार १० जून रोजी घडल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल करण्यास तब्बल १० दिवस उशीर लागल्याचे सांगण्यात आले.

ही रक्कम ऑनलाइन वळती करण्याचा प्रकार १० जून रोजी घडला होता. दररोज किती पैसे मशीनमधून निघाले किंवा भरले गेले याची माहिती बँकेकडून घेतली जाते. त्या वेळी मशीनधील पैसे कमी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्या संबंधित आयडीएफसी बँकेतील ग्राहकाच्या खात्यातून पैसे कपात झाले नव्हते. त्यामुळे ही घटना १४ जून रोजी काहीतरी गडबड असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर जालना रोड एसबीआयचे शाखा व्यवस्थापक आनंदकुमार मेहता यांनी सर्व माहिती घेत त्याच दिवशी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. झालेला प्रकार सांगितला; मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी बीड शहर पोलिसांकडून विलंब लावण्यात आला. २४ जून रोजी भादंवि कलम ४२०, ३८०, कलम ६६ (सी), ६६ (डी), आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप करीत आहेत.

----

हार्डवेअरमध्ये एरर निर्माण करून गुन्हा

जालना रोड परिसरातील एसबीआय बँकेच्या मशीनद्वारे आयडीएफसी बँकेचे खाते क्र. १००६२७८८९८१ व १००६२७२७९१६ व एटीएमचे शेवटचे आकडे ३९८८ तसेच १६७८ वरून एसबीआय कंपनीच्या एडीडब्लूएम मशीनच्या हार्डवेअरमध्ये एरर निर्माण करून अनधिकृत संकेत शब्दांचा किंवा पासवर्डचा किंवा कोणत्याही अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्याचा लबाडीने व अप्रामाणिकपणे वापर करून संगणक व इतर सदृश्य साधनाने अनधिकृत मार्गाने एसबीआयची ४ लाख ४० हजार ५५० रुपये इतकी रक्कम अनधिकृतपणे ट्रॅन्जेक्शन करून बँकेच्या पैशाचा अपहार करून ऑनलाइन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

--------

बँकेतील पैसे सर्वसामान्य नागरिकांचे आहेत. त्यासंदर्भात फसवणूक होणे गैर असून, पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना ताब्यात घ्यावे.

- आनंदकुमार मेहता, व्यवस्थापक, एसबीआय, जालना रोड शाखा.