शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३0 वे राज्य पक्षीमित्र संमेलन जानेवारीमध्ये!

By admin | Updated: August 4, 2016 23:56 IST

अंबेजोगाईची निवड; जयंत वडतकर यांची माहिती.

राम देशपांडेअकोला, दि. ४- ३0 व्या राज्य पक्षीमित्र संमेलनासाठी यंदा बीड जिल्हय़ातील अंबेजोगाई या शहराची निवड करण्यात आली आहे. ७ व ८ जानेवारी २0१७ रोजी होऊ घातलेल्या या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी अंबेजोगाई येथील येस या पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार्‍या युवा संस्थेकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक व अमरावती येथील रहिवासी डॉ. जयंत वडतकर यांनी लोकमतला दिली. राज्यात आढळून येणार्‍या सर्व पक्ष्यांचा अभ्यास महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना करते. सर्व पक्ष्यांबद्दलची अद्ययावत व शास्त्रशुद्ध माहिती ठेवून त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केले जातात. पक्षी संवर्धनाबरोबरच पक्षीमित्र व अभ्यासक वाढविण्यावरसुद्धा या संस्थेचा भर असतो. या दृष्टिकोनातून संस्थेच्यावतीने १९८२ पासून राज्यात विविध ठिकाणी संमेलने आयोजित केली जात आहेत. संमेलनाच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित केले जातात. त्यामध्ये पक्ष्यांचे नवनवीन शोध व त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना यावर व्यापक चर्चा केली जाते. पक्षीमित्र संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सावंतवाडी येथे जानेवारी २0१६ मध्ये झालेल्या २९ व्या संमेलनाचे माजी समेलनाध्यक्ष शरद आपटे, ३0 व्या संमेलनाचे समन्वयक डॉ. जयंत वडतकर, सदस्य डॉ. अनिल पिपळापुरे, प्रा. गजानन वाघ, केशर उपाध्ये आदींच्या उपस्थितीत नुकतीच अंबेजोगाई येथे पार पडली. या बैठकीत यंदाचे राज्य पक्षीमित्र संमेलन ७ व ८ जानेवारी २0१७ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षी मित्रांची संख्या विचारात घेता, मराठवाड्यात ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. वडतकर यांनी सांगितले. गत ३५ वर्षांत मराठवाड्यात तीन राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलने पार पडली. यंदा अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेले संमेलन हे चौथे राहणार आहे.