शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार ५६३ करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिसीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

बीड : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत सहभागी झालेल्या श्रीमंत आणि आयकर भरणाऱ्या ३१ हजार ३५२ ...

बीड : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत सहभागी झालेल्या श्रीमंत आणि आयकर भरणाऱ्या ३१ हजार ३५२ शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी फक्त २७८९ जणांनी पैसे परत केले असून, २८ हजार ५६३ करदात्या शेतकऱ्यांनी पेन्शनची रक्कम परत केलेली नाही.

जिल्ह्यामध्ये ५ लाख ७७६ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा सर्वांना लाभ मिळाला होता. मात्र, यापैकी काही शेतकरी हे श्रीमंत होते तसेच करदातेदेखील होते. तरीदेखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर राज्यभरात तसेच देशभरात अशा सर्व शेतकऱ्यांना मिळालेले योजनेतील पैसे परत करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील ३१३५२ शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा जिल्हा प्रशासनाने पाठवल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त २७८९ शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत पैसे परत भरले आहेत. तर, उर्वरित २८ हजार ५६३ शेतकऱ्यांनी पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा दाखवला आहे.

तहसील प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर २७८९ शेतकऱ्यांनी आतापर्यंत २ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये जमा केले आहेत; तर, अद्याप १९ कोटी २० लक्ष २ हजार जमा होणे बाकी आहे. या सर्वांना वेळोवेळी नोटीस देऊन सूचना करण्यात आलेली आहे. दरम्यान, पुढील काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

आतापर्यंत २ कोटी ६५ लाख वसूल

पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपली नावे योजनेत दाखल करून घेतली होती.

आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील ३१ हजार ३५२ पैकी फक्त २७८९ शेतकऱ्यांनी रक्कम जमा केली आहे.

शेतकऱ्यांनी आतापर्यंत फक्त २ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये जमा केले असून, अद्याप १९ कोटी २० लाख २० हजार रुपये जमा होणे बाकी आहे.

२९ हजार ३३१ लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही.

या योजनेत पात्र असूनदेखील अद्याप २९ हजार ३३१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर, काही शेतकऱ्यांचे पैसे नेमके कुठे जातात, हे कळू शकले नसून, काही शेतकरी नसलेल्यांच्या खात्यावरदेखील पैसे जमा झाल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील अद्याप त्यांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला नाही. तर, नोटीस पाठवलेल्यांपैकी बहुतांश नोकरदार वर्गातील असल्याचे चित्र आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान योजनेचे लाभार्थी

५,२३,७७६

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

२७८९

पैसे भरा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी

३१,३५२

पैसै परत करणे बाकी असलेले शेतकरी

२८,५६३

ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानादेखील या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना तहसील प्रसासनाकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी नोटीस मिळताच रक्कम जमा केली आहे. तर, अनेकांकडून जमा करण्यास विलंब केला आहे. अशा शेतकऱ्यांना वेळोवेळी नोटीस पाठवून सूचना केल्या आहेत. पुढील काळात शासन निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल

निवासी उपजिल्हाधिकारी, बीड