शिरूर कासार : तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. यामुळे येथे रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यात १७१ जणांची तपासणी केली. त्यात सहा जण कोरोनाबाधित आढळून आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर खाडे, आरोग्यसेवक कल्याण सांगळे, आरोग्यसेविका राजश्री डमाळे, आशासेविका उषा गोल्हार, सविता पिंपळे, उषा बडे यांनी अँटिजन तपासणी करून कँप यशस्वी केला.
यासाठी सरपंच देवा गर्कळ, उपसरपंच कैलास गर्कळ, ग्रामसेवक बद्री जगताप, शहादेव गर्कळ, गीता गर्कळ, महादेव गर्कळ, नितीन घोक्षे, बाबासाहेब गर्कळ, कृष्णा गर्कळ यांनी परिश्रम घेतले, तरी नागरिकांनी अँटिजन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन सरपंच देवा गर्कळ यांनी केले आहे. यावेळी जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
===Photopath===
230521\vijaykumar gadekar_img-20210522-wa0038_14.jpg
===Caption===
शिबिराचे औचित्य साधून जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थाना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.