शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बीडच्या कबाड गल्लीत १ लाख ६४ हजारांची देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

बीड : शहरातील कबाड गल्ली भागात एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून १ लाख ६४ ...

बीड : शहरातील कबाड गल्ली भागात एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून १ लाख ६४ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरीत्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. २१ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कबाड गल्ली येथे अंकुश वसंतराव कदम याच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी वाहन पार्किंगच्या जागेत जिन्याखाली देशी दारूचा साठा लपवून ठेवला असल्याचे दिसून आले.

सदर ठिकाणी देशी दारू संत्रा या ब्रँडचे १८० मिली क्षमतेचे ५७ बॉक्स जप्त केले. ज्याची किंमत १ लाख ६४ हजार १६० रुपये इतकी आहे. कबाड गल्ली,बीड याने लॉकडाऊनमध्ये अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी अंकुश कदम याने हा दारूसाठा ठेवला होता. आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात अंकुश कदम याच्याकडून देशी दारू खरेदी करण्याकरिता आलेला इसम नामे दादासाहेब सदाशिव कांबळे (रा. पंचशील नगर, बीड) यालाही अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्कचे बीड येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक घोरपडे, नायबळ, शेळके, गायकवाड, जवान नजमा शेख, मोरे , मस्के, सादेक अहमद, गोणारे व जवान-निवाहन चालक जारवाल, शेळके यांनी केली.

--------

९७ गुन्हे, एक कोटींचा मुद्देमाल जप्त

लॉकडाऊन कालावधीत १ एप्रिल २०२१ पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारु विक्री विरोधात राबविलेल्या मोहिमेत ९७ गुन्हे नोंदविले असून ५२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कालावधीत देशी विदेशी दारुचा मुद्देमाल व वाहनासह एकूण एक कोटी रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

-----------

अवैध धाबे, दारु विक्री केंद्रे तसेच हातभट्टीच्या ठिकाणांवर वारंवार विभागाकडून धाडी टाकण्यात येत असून लॉकडाऊन कालावधीत जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील, याकरिता विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. अवैध दारू , हातभट्टीची दारू व परराज्यातील दारू विरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून अशा कारवाया सुरूच राहतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

===Photopath===

210521\21_2_bed_3_21052021_14.jpeg

===Caption===

बीडच्या कबाड गल्लीत १ लाख ६४ हजाराची देशी दारू जप्त