घरच्या घरी हटवा पांढरे डाग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:34 IST
महिलांसाठी सौंदर्य हा विषय म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. इतर कुठल्याही गोष्टीविषयी त्या टाळाटाळ ...
घरच्या घरी हटवा पांढरे डाग!
महिलांसाठी सौंदर्य हा विषय म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. इतर कुठल्याही गोष्टीविषयी त्या टाळाटाळ करू शकतात. पण चेहर्याविषयी काही आजार किंवा काही त्रास होत असेल तर त्या दुर्लक्ष करत नाहीत. चेहर्यावर मुरूम, ब्लॅकहेड्स किंवा पांढरे डाग ही समस्या खूपच सामान्य झाली आहे.यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. पांढरे डाग असतील तर काही बाबींवर लक्ष ठेवावे लागते. जसे चेहर्याला दिवसातून पाण्यानी धुवावे. खूप पाणी प्यायला पाहिजे. चेहरा गोरा करण्यासाठी भाज्या, फळे, विटॅमिन ए आणि अ असलेले भरपूर खाद्यपदार्थ सेवन केले पाहिजेत. डोक्यात कोंडा असेल तर नेहमी केसांना साफ ठेवायला हवे. महिन्यातून एकदा तरी स्पामध्ये जाऊन फेशियल ट्रीटमेंट जरूर करावी. तसेच तेलरहित मेकअप आणि फाऊंडेशन लावायला हवे. पांढर्या डागांना कधीही फोडायला नको, नाहीतर तो दुखरा फोड बनतो. तुम्ही जास्त ऑईली, मसालेदार किंवा चॉकलेट, दारू पीत असला तर ते कमी करावे. यासोबतच जर नियमितपणे घरगुती उपचारांचे पालन कराल तर पांढर्या डागांपासून तुमची कायमची सुटका होऊ शकते.