शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अॅक्सेसरीजची विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:00 IST

वाहनांसाठी अतिरिक्त साधनसामग्री आवर्जून खरेदी केली जाते. शोरूममधून कार घेतल्यानंतर त्यात मनात असलेली सर्व साधने मिळत नाहीत. या अॅक्सेसरीजचा बाजार आज खूप मोठा व भुलभुलैय्या आहे.

दुचाकी, चारचाकी इतकेच कशाला अगदी ट्रक, बस यासारख्या वाहनांमध्येही अतिरिक्त साधनसामग्रीचा म्हणजे अॅक्सेसरीजचा वापर केला जातो. कार उत्पादनामध्ये सर्वसाधारण आवश्यक गरजांनुसार जी यंत्रणा वा ज्या वस्तू बसवलेल्या असतात, त्या सर्वांनाच पुरेशा असतात िकंवा आवडतात असे नाही. काहींना त्यामध्ये पर्यायही हवे असतात. यामुळेच वाहन उत्पादकांनी वाहनांमध्ये विशेष करून प्रवासी व वैयक्तिक वापराच्या वाहनांसाठी विविध अतिरिक्त अॅक्सेसरीज देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तरीही त्या व्यतिरिक्त साधनसामग्री बसवली जाते. वाहन उद्योगामध्ये साधनसामग्रीच्या वैविध्यतेपायी आज अनेक प्रकारच्या वस्तुंची निर्मिती केली जाते, ग्राहकांकडून त्याला मागणीही असते. अशा या अॅक्सेसरीज वा वस्तू घेताना मात्र प्रत्येकाने चोखंदळपणाबरोबरच त्या वस्तुचा दर्जा, उपयुक्तता, टिकावूपणा, बदलत राहाण्याची इच्छा असली तरी त्यादृष्टीने असणारी  किंमत आदी विविध बाबी लक्षात घ्यायला हव्या. या अॅक्सेसरीजमध्ये काय येते तर वाहन ऑन रोड नोंदणीसाठी आरटीओकडे जी आवश्यक बाब लागते त्या व्यतिरिक्त असलेल्या अन्य सर्व सामग्री या खरे म्हणजे अतिरिक्तच म्हणाव्या लागतील. त्यात काही वस्तू सुविधा, आराम देणाऱ्या असतात तर काही वस्तू शोभेच्या बाहुलीप्रमाणे उपयोगाच्या असतात. काही वस्तू गाडीच्या मूळ वस्तूंचे संरक्षण करण्यासाठीही उपयोगी पडत असतात. यामध्ये सीट कव्हर्स, स्टिअरिंग कव्हर्स, अतिरिक्त हॉर्न, म्युझिक सिस्टिम, देवादिकांच्या मूर्ती, धार्मिक वैविध्यानुसार असलेल्या बाबी, एअर फ्रेशनर, डॅशबोर्ड कव्हर, फ्लोअरिंग लॅमिनेशन, रबर मॅट, अंतर्गत प्रकाशासाठी लागणारे एलईडी दिवे, हेडलॅम्प प्रखर लावता यावेत यासाठी कटआऊट, व्हॅक्यूम क्लीनर, प्लोअर, टायरमध्ये हवा भरण्यासाठी लागणारा पंप, हात पुसायचे कागद, गाडी सुंदर सजवण्यासाठी लागणारे स्टिकर्स व लाईट इत्यादी... अशा कितीतरी वस्तू वा साधनसामग्री अशी असते, की जी अनेकजण आवडीने खरेदी करतात. गाडीमध्ये त्याचा वापर होतो, कालांतराने त्या वस्तू फेकूनही दिल्या जातात. कार अॅक्सेसरीजच्या विविध वस्तुंचा बाजार आज खूप मोठा आहे. देशी व परदेशी अशा अनेक वस्तुंचे आकर्षण यामधून पडत असते. देशी वा परदेशी काही अशा काहीही वस्तू असल्या तरी त्यांची उपयुक्तता व गरज आणि आकर्षण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते. त्यामुळे त्या वस्तू घेताना त्यांची गरज असतेच का, असा प्रश्न सध्याच्या काळात तरी कोणालाच विचारून उपयोगाचा नाही. अशा प्रकारच्या अॅक्सेसरीज घेण्यासही हरकत नाही, पण त्याचा वापर होणार आहे का, त्या खरोखरच उपयोगाच्या आणि टिकावू आहेत का, त्या वस्तुंची सवय होणार नाही ना, नाहीतर भविष्यात त्यामध्ये बदल झाले तर त्या न मिळाल्याने काहींना वाहन चालवणेही कठीण झालेले दिसते. अशा वेगवेगळ्या अॅक्सेसरीजची महती व माहिती प्रत्येकाला असायला हवी. त्यासाठी असलेल्या बाजारात वा दुकानांमध्ये जाऊन त्या वस्तू खरेदी करण्याची हौसही अनेकांना  असते. पण काही वस्तू पाहिल्याविना खरेदी करू नयेत, इतके मात्र खरे.