आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 07:18 IST2026-05-17T07:17:49+5:302026-05-17T07:18:37+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - May 17, 2026, The job and business environment will be favorable for you. | आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

मेष - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

वृषभ  - आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा  

मिथुन  - आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आणखी वाचा

सिंह - आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. भावंडांकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ  - आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

वृश्चिक - आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील.  आणखी वाचा

धनु - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मकर - निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा

कुंभ  - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मीन -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. आणखी वाचा

Open in app

Web Title : 17 मई, 2026 राशिफल: नौकरी-व्यवसाय में अनुकूल वातावरण रहेगा।

Web Summary : राशियों के लिए मिश्रित भाग्य। मेष, खर्चों पर नियंत्रण रखें। वृषभ, उत्साह से उत्कृष्ट प्रदर्शन करें। मिथुन, स्वास्थ्य संबंधी चिंताएं। कर्क, लाभ की उम्मीद। सिंह, कार्यस्थल पर दबदबा। कन्या, वित्तीय लाभ। तुला, वाणी पर नियंत्रण रखें। धनु, अनुकूल वातावरण का आनंद लें। अन्य, सावधानी बरतें।

Web Title : May 17, 2026 Horoscope: Favorable work environment awaits you.

Web Summary : Mixed fortunes for zodiac signs. Aries, control expenses. Taurus, excel with enthusiasm. Gemini, health concerns. Cancer, expect gains. Leo, dominate work. Virgo, financial benefits. Libra, control speech. Sagittarius, enjoy favorable environment. Others, exercise caution.