शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या शिलेदारांचा एसटी, दुचाकीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 00:11 IST

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आही.

आचारसंहितेचा फटका : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमाअमरावती : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींची वाहने जिल्हा परिषदेत जमा करण्यात आली आहेत. परिणामी सद्यस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धामणगांव रेल्वे तालुक्यातील बोरगांव धांदे या गावापासून जिल्हा मुख्यालयाचा प्रवास केला तर उपाध्यक्ष सतीश हाडोळे व सभापती गिरीश कराळे यांनी दुचाकीने कार्यालय गाठले.२७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यात शासकीय वाहने कार्यालयाकडे जमा करण्याचा नियम आहे. नगरपालिकांसाठी १७ आॅक्टोबरपासून आचारसंहिता अंमलात आली. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना वाहने जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने १८ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, शिक्षण व बांधकाम सभापती गिरीश कराळे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अरूणा गोरले, समाज कल्याण सभापती सरिता मकेश्वर आदींनी त्यांच्या दिमतीला असलेली शासकीय वाहने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे जमा केली आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयातील पदाधिकारी सध्या मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहेत. विद्यमान अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे स्वत:चे वाहन नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयात येण्यासाठी चक्क एसटी बसने प्रवास केला तर उपाध्यक्ष सतीश हाडोळे व सभापती गिरीश कराळे दुचाकीवरून कार्यालयात पोहोचले. त्यामुळे बघ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. (प्रतिनिधी)