शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.,पं.स.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: August 19, 2016 23:59 IST

मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे.

आयोगाचे निर्देश : ५ आॅक्टोबरला सोडतअमरावती : मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. यामध्ये ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रभागरचना होणार आहे. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गटांची व याच दिवशी तहसीलदारांमार्फत पंस गणांची आरक्षण सोडत काढणार आहेत.जिल्ह्यातील दहा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कार्यकाळ मार्च २०१७ अखेरीस संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर आयोगाने प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १३ हजार ७०९ इतकी आहे. यामध्ये ३ लाख ४० हजार ५३४ अनुसूचित जाती व ३ लाख ६२ हजार ८९० इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या आधारावर जिल्हा परिषदेचे ५९ गट राहतील. यामध्ये ३० गट महिलांसाठी राखीव असतील. कहीं खुशी कहीं गमअमरावती : सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २० व याच प्रवर्गात १० गट महिलासाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २० गट राखीव असून यातील ६ गट हे महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातींकरिता १२ गट राखीव आहेत. यामध्ये ६ गट महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागासप्रर्वगासाठी १६ गट राखीव असून यातील ८ गट महिलांसाठी आहेत. पंससाठी यावेळी ११८ गण राहणार आहेत. या निवडणुकीसाठी चिखलदरा, अमरावती व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी एक गट वाढला आहे. तर अंजनगाव सुर्जी, भातकुली व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एक गट या निवडणुकीसाठी कमी करण्यात आला आहे.यामध्ये अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यांतील २०१२ मध्ये असलेल्या ४ गटांऐवजी आता तीनच गट राहणार आहेत. तर चांदूररेल्वे तालुक्यात तीनऐवजी दोनच गट राहतील. या तीन तालुक्यांत झेडपीचा एक गट कमी झाला आहे. तर दर्यापूर तालुक्यांत ४ऐवजी पाच गट होणार आहेत. चिखलदरा तालुक्यात एक गट वाढला असून तीनऐवजी चार गट झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यातून चार सदस्य आगामी निवडणुकीत निवडून द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करतील. त्या प्रस्तावाला २३ सप्टेंबरला मान्यता देण्यात येईल. २८ ला जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जि.प.गटांची व तहसीलदार पंस.गणांची आरक्षण सोडत काढतील. यावर १० ते २० आॅक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. या हरकतींवर १७ नोव्हेंबरला सुनावणी होवून २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल.