शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ जुळेना?

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये धडकी : नियमित पावती देण्याची मागणीअमरावती : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीचा ताळमेळ लागत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावत्या देण्याची मागणी कर्मचाऱ्यामधून होत आहे.जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याकाठी भविष्य निर्वाह निधीची कपात केली जाते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना याबाबत पावती सुध्दा दिली जात होती. मात्र सन २०११-१२ मधील भवष्यनिवाह निधीच्या पावत्या आता देण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये कपातीचा ताळ मेळ जुळत नसल्याने याची कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. सन २०११-१२ मधील पावतीनंतर भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मागील तीन ते चार वर्षापासून कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्याच्या कपात होणाऱ्या रक्कमेचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनासोबत भविष्य निर्वाह निधीबाबतची पावती देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना १ मार्च २०१२ पासून याबाबतच्या पावत्याच देण्यात आलेल्या नाहीत. पावत्या मिळत नसल्या तरीही अनेक कर्मचाऱ्यांना आपला व्यवहार सुरळीत असल्याचा समज झाला. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या खात्यातून भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत तफावत दिसून आली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कपात बाबतची पावती दर महिन्या काठी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियने केली आहे.भविष्य निर्वाह निधीत कपात करण्यात आलेल्या रक्कमेच्या बाबत संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती देण्यात यावी व यात असलेल्या उणीवा त्वरीत दुर कराव्यात अशी आमची मागणी आहे. - पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी युनियनकर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी कपातीच्या पावत्या त्यांना नियमित देण्याबातची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना रितसर पावती दिली जाईल- चंद्रशेखर खंडारे, मुख्यलेखा व वित्त अधिकारीजिल्हा परिषद