शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद : कनिष्ठ, वरिष्ठ सहायकांचा समावेश

By admin | Updated: June 7, 2014 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मागील पाच वर्षापासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या

कर्मचार्‍यांमध्ये खांदेपालटअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मागील पाच वर्षापासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कनिष्ठ, वरिष्ठ सहायक आणि एका  कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी टेबल बदलवून दुसर्‍या ठिकाणी पदस्थापना दिली आहे. जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन, बांधकाम, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि सिंचन या सात विभागात  मागील पाच वर्षापासून कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेच्या पदावर  विभागनिहाय अंतर्गत टेबल बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक पाच, वरिष्ठ सहाय्यक सहा आणि एका कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांचा अंतर्गत टेबल बदलविण्यात आलेल्यांमध्ये समावेश  आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेत विविध पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशासकीय कामकाज करताना एकाच ठिकाणी काम करताना पाच वर्षाचा  कालावधी झाल्यास अशा कर्मचार्‍याच्या प्रशासकीय टेबल शासन निर्णयानुसार बदलविण्यात येतात. याचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेतील एकूण  १२ कर्मचार्‍यांचे टेबल बदलविले आहेत. मुख्य कार्यकारी अनिल भंडारी यांनी टेबल बदल केलेल्या कर्मचार्‍यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ  सहाय्यक २, बांधकाम १, सामान्य प्रशासन १, शिक्षण विभाग १, वरिष्ठ सहाय्यकांमध्ये बांधकाम २, शिक्षण एक, महिला व बालकल्याण एक,  आरोग्य विभाग दोन याप्रमाणे समावेश आहे. नव्याने बदल झालेले विभाग समीर उमले पशुसंवर्धन (शिक्षण), भीमा इंगळे पशुसंवर्धन (सामान्य प्रशासन), नीलेश दहातोंडे बांधकाम  (पशुसंवर्धन), चैतन्य वाकोडे सामान्य प्रशासन (पशुसंवर्धन), किरण बघेले शिक्षण (बांधकाम) या कनिष्ठ सहाय्यकांचा तर वरिष्ठ सहाय्यकांमध्ये  मंगला वानखडे बांधकाम (आरोग्य), आर. के. पवार आरोग्य (सामान्य प्रशासन), आर. एम. गजभिये बांधकाम (आरोग्य), सुनील वानखडे  शिक्षण (महिला बालकल्याण), डी. डी. नागपूरकर आरोग्य बांधकाम, एन. एम. बद्रे महिला बालकल्याण (बांधकाम) आणि कनिष्ठ प्रशासन  अधिकारी पी. एन. पारधी सिंचन विभाग (आरोग्य) याप्रमाणे टेबल बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात  नवीन कर्मचारी काम करणार असल्याने त्यांना काही दिवस तरी कामात अडचणी येतील. (प्रतिनिधी)