शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद क्वॉटर्समध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 12, 2014 23:29 IST

शहर कोतवाली पोलीस ठाण्यातंर्गत जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान चोरट्यांनी धुमाकुळ घातला. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या बंगळ्याजवळच हा प्रकार घडला.

अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्यातंर्गत जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान चोरट्यांनी धुमाकुळ घातला. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या बंगळ्याजवळच हा प्रकार घडला. तेथील दोन घरांची दारे चोरट्यांनी तोडली. चोरट्यांचा शोध घेताना नाागरिकांनी रात्र जागून काढली. मालटेकडी लगतच्या जिल्हा परिषद क्वॉर्टरमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सदस्य वास्तव्यास आहेत. काही दिवसांपासून क्वार्टर परिसरात दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीच कर्मचारी व जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी पोलीस विभागाकडे चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जिल्हा परिषद क्वॉर्टर परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली होती. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा चोरट्यांनी येथे सोमवारी मध्यरात्री धुमाकुळ घातला. मध्यरात्री दरम्यान चोरट्यांनी एका घराचे दार तोडले तर दुसऱ्या घराचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान नागरिकांना दार तोडण्याचे आवाज आल्यामुळे काही नागरिकांनी झोपेतून उठून बाहेर निघाले. त्या ठिकाणी ५ ते ६ अनोळखी नागरिक परिसरात फिरत असल्याचे निर्देशनास आले. नागरिकांंनी त्या चोरट्यांना हटकले असता चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या चोरट्यांपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.