शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युवा स्वाभिमानची आज विदर्भस्तरीय दहिहंडी

By admin | Updated: August 27, 2016 23:59 IST

आ.रवी राणाप्रणित युवा स्वाभिमानची विदर्भस्तरीय दहिहंडी कार्यक्रम रविवार २८ आॅगस्ट रोजी होत आहे.

स्वतंत्र विदर्भाला समर्पित : 'सैराट' चित्रपट टीम येणारअमरावती: आ.रवी राणाप्रणित युवा स्वाभिमानची विदर्भस्तरीय दहिहंडी कार्यक्रम रविवार २८ आॅगस्ट रोजी होत आहे. राजापेठ चौकात सकाळी १० वाजतादरम्यान सुरू होणाऱ्या या दहिहंडी उत्सवादरम्यान आ. रवि राणा यांच्या मुलासह ४ आॅगस्टला जन्मलेल्या १०० मुलांचे नामकरण होणार आहे. हा नामकरण सोहळा सर्वधर्मीय धर्मगुरु आणि लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत होईल.स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सैराट या मराठी चित्रपटातील कलाकारांसह अन्य कलावंत स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहणार आहे. दहीहंडी स्पर्धेसाठी राजापेठ चौक सज्ज झाला आहे. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही दहिहंडी स्पर्धा होणार आहे.ज्या मुला-मुलींचे नामकरण या दहिहंडी स्पर्धेत होईल, त्यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना कपडे आणि आर्थिक मदत दिली जाईल. दहिहंडी स्पर्धेदरम्यान कृष्ण व राधा सजावट, नूत्य, नाट्य, संगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे छायाचित्रिकरण करणाऱ्या १० उत्तम छायाचित्रकारांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले जाणार आहे. या दहिहंडीला आर्ची आणि परशा ही सैराटमधील जोडगोळी येणार असल्याने ही स्पर्धा पाहण्यासाठी अभूतपूर्व गर्दी उसळण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून बडनेरा मतदार संघाचे आ.रवी राणा हे सातत्याने या विदर्भस्तरीय दहिहंडी स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. अमरावतीत होणाऱ्या अन्य स्पर्धेच्या तुलनेत राणा यांची दहिहंडी स्पर्धा विविध अर्थाने वेगळी असते. लाखोंची बक्षिसे चित्रपट तारे-तारकांच्या उपस्थितीने दहिहंडी स्पर्धेला प्रत्येक वर्षी अभूतपूर्व गर्दी उसळते यंदाही सैराट टीममधील तारे तारकांच्या लाईव्ह संवादासाठी भरेमोठ व्यासपीठ उभारण्यात आले असून डिजिटल स्क्रिन लावण्यात आल्या आहे. या दहिहंडी स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट होणार असून राणा दाम्पंत्यासह युवा स्वाभिमानची कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्ते या उत्सवासाठी झटत आहे.