शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकखाली येऊनही तरूण-तरूणी बचावले

By admin | Updated: February 16, 2017 00:04 IST

ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील युवक-युवती ट्रकखाली आलेत.

काळ आला होता पण ... : मागून धडक दिल्याने अपघातअमरावती : ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील युवक-युवती ट्रकखाली आलेत. मात्र, 'देव तारी त्यांना कोण मारी,' या म्हणीनुसार या भीषण अपघातातून दोघेही सुखरुप बचावले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता बडनेरा रोडवरील समर्थ हायस्कूल चौकात घडली. ऋषी भारत चक्रे (२३,रा. लोणी पोलीस क्वार्टर) व त्याची मैत्रीण कृष्णा चाटे (२०,रा.पार्वतीनगर) हे दोघेही शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकतात. बुधवारी दोघेही कृष्णा चाटे हिच्या मोपेड वाहन क्रमांक एम.एच. २७-बी.टी.-९९५७ ने नवाथेकडून राजापेठकडे येत होते. दरम्यान समर्थ हायस्कूल चौकातील गतिरोधकाजवळ बडनेराकडून राजापेठकडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम.एच. १४-व्ही-८९० ने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. अपघातात दुचाकी ट्रकखाली चिरडली गेली दोघेही ट्रकखाली आले. दोघांनाही गंभीर दुखापतअमरावती : त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी होती. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर अक्षरश: शहारे आलेत. मात्र, ट्रक थांबताच नागरिकांनी तत्काळ दोघांनाही ट्रकखालून सुखरूप बाहेर काढले. मात्र, या भीषण अपघातात तरुणीच्या कंबरेला तर ऋषी चक्रेच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी दोघांनाही तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. पोलिसांनी ट्रक व चालक मसद्दीन हुसेन (४५,रा. धरमकाटा) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली होती.