शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कपाशीची फक्त १६० किलो उत्पादकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:00 IST

यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देनजरअंदाज अहवाल : शेतकरी अडचणीत, भरपाईची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा गुलाबी बोंड अळीच्या संकटाने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता अहवाल काय दर्शवितो, याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. कापसाचे (रूई)े हेक्टरी १६० किलो उत्पादन होणार असल्याचा अहवाल शासनाला सादर झाल्याची माहिती आहे.यंदाच्या हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबर महिन्यापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क््यांपर्यंत बोंडे किडली असल्याचे अहवालाद नमूद केलेले आहे. या समितीमध्ये कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग आहे. हे ‘जीएचआय’ प्रमाणपत्र कृषी संचालकांनादेखील सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागद्वारा जाहीर करण्यात येणारी प्राथमिक नजरअंदाज उत्पादकता काय राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता हेक्टरी १६० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल कृषी सहसंचालकांना सादर झाला व हीच उत्पादकता शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.यंदा पेरणीपासून कमी पावसाने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची संकट ओढवले. यामधून जी कपाशी बचावली, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात ‘रोटाव्हेटर’ फिरविले. जिल्ह्यात यंदा २ लाख ७ हजार ४५७ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र, बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याचा जीन्स असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे विक्री केल्यामुळेच संकट ओढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंतीदेखील पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंड अळीला मारक क्षमता नसल्याने सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.पीकविम्याचा मिळावा लाभयंदाचा खरीप हंगाम सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाने उद्ध्वस्त झाला. पावसात सलग खंड राहिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ व पीक विम्याच्या निकषानुसार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे. आता तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३३ टक्क््यांवर नुकसान झाले आहे. ही दोन्ही आपत्ती भरपाई मिळण्यास पात्र असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.