शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या कृषी महोत्सवात मूळ उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:55 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात ...

ठळक मुद्देरिकाम्या खुर्च्या अन् स्टॉल : शेतकऱ्यांशी संवाद कसा?

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात दाखल झाले, त्यांनीदेखील पाठ फिरविली. प्रतिसाद लाभत नसल्याने व स्टॉलचा खर्चदेखील निघणे कठीण झाल्याने महोत्सव संपण्याची वाट न पाहता अनेक स्टॉलधारकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले. यावेळी शासकीय विभागासाठी आरक्षित डोममध्ये ऐनवेळी साड्या, ज्वेलरी, कंझ्यूमर आदींचे स्टॉल लावण्यात आले. कार्यशाळा, परिसंवादात खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर निमंत्रक अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. या महोत्सवस्थळी संरक्षणाचा अभाव होता. यासाठी टिनपत्र्यांचे कुंपण आवश्यक असताना प्रत्यक्षात ते दिसून आले नाही.शासनाच्या कृषी महोत्सवाचा पहिल्यांदाच फ्लॉप शोजिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्यांपैकी पहिल्यांदाच यंदाचा कृषी महोत्सवाचा फ्लॉप शो झाला. आयोजनावरील २० लाखांना निधी निव्वळ वाया गेला. याला जबाबदार जिल्ह्याची ‘आत्मा’ यंत्रणा असल्याने शासनाची एकप्रकारे नाचक्की झाली. पालकमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतल्याने ढिसाळ आयोजनाबाबत कारवाई करणार काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.