शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'रुप पालटू शिक्षणाचे' या विषयावर कार्यशाळा

By admin | Updated: June 20, 2016 00:06 IST

२१ व्या शतकातील नवीन आव्हाने विद्यार्थ्यांना पेलता यावी, यासाठी आहे त्या शिक्षण पद्धतीत आणखी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून....

तज्ज्ञांनी केले शिक्षकांना मार्गदर्शन : विदर्भातून शिक्षक दाखलअमरावती : २१ व्या शतकातील नवीन आव्हाने विद्यार्थ्यांना पेलता यावी, यासाठी आहे त्या शिक्षण पद्धतीत आणखी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याचा सामूहिक प्रयोग व प्रयत्न करण्याच्या दिशेने पाऊल उचलणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात प्रयोगशील शाळा करण्याच्या उद्देशाने येथील गर्ल्स हायस्कूल कॅम्पजवळील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये तज्ज्ञांना बोलावून त्यांची कार्यशाळा १६ ते १९ जूनदरम्यान विनामूल्य घेण्यात आली. शिक्षण म्हणजे काय ? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? शिक्षणाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो आदी प्रश्नांबाबत मात्र ते अनभिज्ञ दिसून येते. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, पुस्तके, ट्युशन व होमवर्क यामुळे ते प्रचंड तणावात असतात.आजच गरज आहे ती हसत खेळत बुद्धिविकास व आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची, बदलत्या काळानुरुप भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची, त्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव देण्याची, आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अव्वल स्थान प्राप्त करण्याची, त्यासाठी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, बहुदश, एकदश विचार, मूल्यमापन, प्रयोगशीलता, निरीक्षण व स्वयंअध्ययन यावर अधिक भर देण्याची गरज आहे. आनंददायी बहुपयोगी शिक्षण कसे असावे, यासाठी विदर्भातून आलेल्या शिक्षकांना पत्रकार विजय फणसेकर, जागतिक मोटीव्हेशनल ट्रेनर सुधीर मोरे, कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे, शाळेचे संचालक तथा आर्किटेक्ट अतुल गायगोले, शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या संचालिका अमृता गायगोले आदींनी तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सुधीर मोरे यांनी जीवन कसे जगावे यासंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. अतुल यादगिरे यांनी अनेक यशस्वी लोकांचे दाखले देऊन जीवनात कसे आनंदी व्हायचे व आरोग्य कसे जपायचे यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. विजय फणसीकर यांनीही शिक्षकांना वक्तव्यशैलीने मंत्रमुग्ध केले. या कार्यशाळेत जीवनाचे ध्येय व उद्देश यांचा शोध घेणे, आंतरिक शिक्षण, थेअरी व प्रॅक्टिकल यांचा समन्वय, वर्ग नियोजन सीसीई, डीआरए-२ वैशिष्ट्यपूर्ण फिनलँड स्कूल मॉडेलची ओळख, विषयाचे एकत्रिकरण व आकलन करणे, तसेच २१व्या शतकातील तांत्रिक व शैक्षणिक आव्हाने इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. नावीन्यपूर्ण बदलाची क्षमता बाळगणाऱ्या प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही कार्यशाळा नक्कीच टर्निंग पॉईट ठरली आहे. (प्रतिनिधी)