शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी होणार नगरसेवकांची कार्यशाळा

By admin | Updated: September 19, 2015 00:21 IST

स्मार्ट सिटी अभियानाची इंत्थभूत माहिती देण्यासाठी लवकरच नगरसेवकांची कार्यशाळा घेतली जाईल,..

आयुक्तांची माहिती : मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्यअमरावती : स्मार्ट सिटी अभियानाची इंत्थभूत माहिती देण्यासाठी लवकरच नगरसेवकांची कार्यशाळा घेतली जाईल, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी येथे दिली.महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी स्मार्ट सिटी अभियानात अमरावती शहराचा समावेश झाल्याचा मोठा गवगवा करण्यात आला असला तरी या अभियानातून नगरसेवकांना बाजूला ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट सिटी अभियानात नेमके काय करणार याची माहिती एकाही सदस्यांना नसल्याचे हरमकर म्हणाले. स्मार्ट सिटीविषयी माहिती मागितली तर ती इंग्रजीत देण्यात आली. सर्वच सदस्यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे या योजनेची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी हरमकर यांनी केली. हरमकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे निराकरण करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नगरसेवकांची लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे. नगरसेवकांची कार्यशाळा आटोपल्यानंतर झोन व प्रभागनिहाय नियोजन केले जाणार आहे. जनतेच्या प्रतिक्रियांना देखील स्थान दिले जाणार आहे. मूलभूत सोई सुविधांना प्राधान्य देण्यावर भर असून पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेसाठी ९०० कोटी रुपये मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दवाखान्याचे शुल्क १० रुपयेमहापालिका दवाखान्यात रुग्णांकडृून १० रुपये शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला. शुल्क आकारणे बंद करुन चिठ्ठीमुक्त योजना राबविण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. मात्र बबलू शेखावत, कांचन ग्रेसपुंजे, प्रवीण हरमकर, विलास इंगोले, मिलिंद बांबल, जयश्री मोरय्या, छाया अंबाडकर, प्रदीप हिवसे, तुषार भारतीय, प्रदीप दंदे आदींनी १० रुपये शुल्क ठरविले.नेदरलँडच्या मदतीने स्वच्छ पाणीपुरवठास्मार्ट सिटी अभियानात नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा देण्याचे प्रस्तावित आहे. नेदरलँडकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छ पाणीपुरवठा केला जाणार आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गोवा येथे शुक्रवारी पार पडलेल्या कार्यशाळेत नेदरलँडने स्वच्छ पाणीपुरवठा करणारे आधुनिक तंत्रज्ञान देण्याचे ठरविले असून ही यंत्रणा शहरासाठी वापरली जाणार आहे.स्टार बसेस रद्दचा जाब विचाराकेंद्र शासनाने जेएनएमयुआरएम योजनेतंर्गत महापालिके ला मंजूर केलेल्या ६४ स्टार बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने याविषयी केंद्र शासनास जाब विचारावा, असा प्रस्ताव सुनील काळे यांनी मांडला. स्टार बसेससाठी टाटा कंपनीला एक कोटी रुपये सुद्धा देण्यात आले आहे. ही योजना रद्द करण्यात आली असल्याने केंद्र शासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता येईल, काय याविषयी विचार करावा, असे काळे म्हणाले. मात्र ही योजना रद्द करण्यात आली असली तरी अमृत योजनेतून शहराला स्टार बसेस मिळणार अशी माहिती सभागृहाला दिली.