शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर कारवाई

By admin | Updated: November 15, 2016 00:09 IST

सावर्डी एमआयडीसीतील एका प्रतिष्ठित कंपनीत बांधकाम करीत असताना मजुराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला.

अमरावती : सावर्डी एमआयडीसीतील एका प्रतिष्ठित कंपनीत बांधकाम करीत असताना मजुराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणात ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करून तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी सोमवारी सकाळी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपाने ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला. वडरपुऱ्यातील रहिवासी गजानन महादेव मुंधळकर (२५) हे रविवारी सावर्डी एमआयडीसीतील एका कापड कंपनीत ठेकेदाराच्या बोलावण्यावरून कामकरिता गेले होते. बांंधकामस्थळी असणाऱ्या मिक्सर मशिनवर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा झटका बसला. इर्विन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गजानन यांना मृत घोषित केले. ठेकेदाराच्या अटकेची मागणीअमरावती : घटनेची माहिती सायंकाळी मिळाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी तक्रार नांदगाव पोलिसांना दिली. सोमवारी पोलीस प्रकाश पाल व गजानन परतेती यांच्या उपस्थितीत शव विच्छेदन होणार होते. मात्र, ठेकेदाराला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची समजूत घातली व ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.मजुराच्या मृत्यू प्रकरणात ठेकेदारावर कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांची होती. मात्र, ठेकेदारावर कायदेशिर कारवाई केल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला. -उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, नांदगाव पेठ.