शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरांच्या हक्कासाठी संवेदनशीलतेने काम करा

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज ...

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : बालदिन सप्ताहाचा समारोपअमरावती : बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विशेष प्रशिक्षण केंद्र दसरा मैदान, अमरावती येथे आयोजित बालदिन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात असून या प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बालकामगार मुलांचे पुरर्वसन करण्यासाठी काम केले जाते. बालदिवसाचे औचित्य साधून बाल सप्ताहाचे आयोजन प्रकल्पा मार्फत करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वसंतराव साउरकर, अध्यक्ष अमरावती जिल्हा बाल कल्याण समिती, प्रकल्प संचालक बी. जाधव, सरकारी कामगार अधिकारी, अंजली कुथे, सचिव जिल्हा बाल कल्याण समिती आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रकल्पांतर्गत सप्ताहाभर चाललेल्या उपक्रमाची तसेच प्रकल्पाची कामकाजाची प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर यांनी मान्यवरांना माहिती दिली. या दरम्यान परिसर स्वच्छता, केंद्र स्वच्छता, पालकसभा, चित्रकला स्पर्धा तसेच विविध खेळांच्या स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र चालविणाऱ्या अमरावती जिल्हा बालकल्याण समिती संस्थेचे अयध्क्ष वसंत साउरकर यांनी देखील प्रकल्पाच्या तसेच संस्थेच्या उपक्रमांविषयी अध्यक्षीय भाषणातून माहिती दिली. याप्रसंगी बालकामगार प्रकल्पातील शिरीष देशमुख, प्रकाश गावफळे, संजय शहाकार, पंकज देशमुख, ललित ताथोडे, बबन हजारे उपस्थित होते. संचालन सुनीता देशमुख यांनी केले. तसेच अंजली कुथे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी इतर पाहुण्यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती.