शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बेनोडा येथे कोविड रुग्णालयाचे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

वरूड / बेनोडा : तालुक्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून ...

वरूड / बेनोडा : तालुक्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून कोविड रुग्णालयाचे काम युद्धस्तरावर सुरू केले. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा करून आढावा घेतला. गुरुवारला जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी बेनोडा येथील आरोग्य केंद्रात जाऊन कोविड रुग्णालयाचा कामाचा आढावा घेतला. १७ मे रोजी रुग्णालय कार्यान्वित करून लोकार्पणाचे आदेश वजा सूचना दिल्या. तातडीने ऑक्सिजन असलेले ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू होत असल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. नागपूर अमरावतीला गंभीर रुग्णांसाठी खाट उपलब्ध होत नसल्याने कोविड रुग्णांसह नातेवाइकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे. अनेकांनी प्राणसुद्धा गमावले. याकरिता मोर्शी, वरूड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेसोबत चर्चा करून तातडीने बेनोडा येथे कोविड रुग्णालय मंजूर करून घेतले आणि प्रत्यक्ष कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आली. बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली होऊन मंगळवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दौरा करून अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी रुग्णालयाची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. १७ मे ला कोविड रुग्णालय कार्यान्वित करून लोकार्पित करावे, असे स्पष्ट आदेश दिल्याने युद्धस्तरावर काम सुरू आहे. नोडल अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, बेनोडा वैद्यकीय अधिकारी सोहेल खान, सहायक नोडल अधिकरी सुधाकर राऊत, आरोग्य सेवक राजेंद्र शेळके, रोशन दारोकर उपस्थित होते. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३१ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली असून, सुसज्ज कोविड रुग्णालयात एक फिजिशियन हृदय रोग तज्ज्ञ , एक एमबीबीएस डॉक्टर, २ बीएएमएस डॉक्टर, ११ एएनएम, ६ सफाई कामगार, १० कक्ष सेवक यांना जिल्हाशल्य चिकित्सकांनी नियुक्त केले आहे. नोडल अधिकरी म्हणून डॉ. प्रमोद पोतदार राहतील. १७ मे रोजी रुग्णालय कार्यान्वित करून लोकार्पणाचे आदेश दिले. ऑक्सिजन असलेल्या ५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू होत असल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.