लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विनयभंग प्रकरणातील पीडित डॉक्टर महिलेने बुधवारी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. तिने पोलीस अधीक्षकांशी भेटण्याचा आग्रह धरल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर गाडगेनगर पोलिसांनी त्या महिलेस ताब्यात घेऊन न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.पीडित महिलेने चांदूरबाजार पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्यामुळे पीडिता न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे दाद मागत आहे. सोमवारी पीडित डॉक्टर महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात पेट्रोलची बॉटल घेऊन पोहोचली होती. तिच्या या कृत्याबद्दल गाडगेनगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.बुधवारी ती महिला पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी ती आग्रही होती. यादरम्यान महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असता, ती आक्रमक झाली. पीडित व महिला पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर तिला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेला आत्महत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने तिला जामीन दिला आहे.डीएचओंसह तिघांना अटकपूर्व जामीनविनयभंग प्रकरणातील आरोपी जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, राजेंद्र राठी, हेमंत फुके व एक महिला यांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती चांदूरबाजारचे ठाणेदार उदयसिंह साळुंके यांनी दिली आहे.व्हिडीओ शूटिंग काढणारे तरुण पळालेपीडित महिला दोन तरुणांसोबत आली होती. पीडित महिला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शिरताच त्या तरुणांनी मोबाइलमध्ये चित्रफीत काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही बाब एसपी दिलीप झळके यांना कळली. त्यांनी पीडित महिलेसह त्या दोघांनाही डिटेन करण्याचे आदेश दिले असता, त्या दोन्ही तरुणांनी तेथून पळ काढला.‘ती’ डॉक्टर महिला पोलिसांना आवरता आवरेनापीडित महिलेला एसपी कार्यालयातून ताब्यात घेताना दहावर महिला पोलिसांची दमछाक झाली. तिला पोलीस जीपमध्ये बसविताना ती आवरेनाशी झाली. कसेबसे त्या महिलेला गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे उपस्थित महिला पोलिसांनाही ती अंगाला हात लावू देत नव्हती. त्यामुळे महिला पोलीस तिला पकडण्याची हिंमत करीत नव्हत्या. ठाण्याच्या परिसरात फिरत असलेल्या पीडित महिलेला आठ ते दहा महिला पोलिसांनी घेराव घातला. मात्र, तिच्या हात घालण्याची स्थिती त्यांची नव्हती.
महिला डॉक्टर पुन्हा एसपी कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:49 IST
विनयभंग प्रकरणातील पीडित डॉक्टर महिलेने बुधवारी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. तिने पोलीस अधीक्षकांशी भेटण्याचा आग्रह धरल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर गाडगेनगर पोलिसांनी त्या महिलेस ताब्यात घेऊन न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.
महिला डॉक्टर पुन्हा एसपी कार्यालयात
ठळक मुद्देगाडगेनगर पोलिसांनी घेतले ताब्यात : न्यायालयासमक्ष केले हजर