शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाला महिलांचा विरोध

By admin | Updated: May 25, 2017 00:08 IST

स्थानिक आशियाड कॉलनी शेगाव चौकात परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन : कुठल्याही परिस्थितीत दुकान नकोचलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक आशियाड कॉलनी शेगाव चौकात परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या परिसरात दुकान नकोच, अशी मागणी बुधवारी या परिसरातील महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.आशियाड कॉलनी परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारूचे दुकान सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. हा परिसर अतिशय वर्दळीचा असून या मार्गावर महिला, मुली, वृध्द व नागरिकांनी ये-जा असते, अतिशय गजबजलेल्या या ठिकाणी दारूचे दूकान सुरू झाल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारू दूकानासाठी काही मंडळी प्रशासकीयस्तरावर जोरदार प्रयन्न करीत असल्याचे येथील महिलांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. येथील नागरिकांची दिशाभूल करून दारू दुकानाचा परवाना मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. दुकाना विरोधात महिलांच्या तीव्र भावनांचा आदर करून या ठिकाणी दारू दूकान सुरूच होवू नये अशी मागणी निवेदनाव्दारे महिलांनी केली आहे. दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री पोटे व जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले आहे. यावेळी अर्चना सपकाळ, मीना पुंडकर, माधवी देशमुख, वैशाली देशमुख, शिल्पा बिरोले, अलका तलवारे, सोनाली पिंजरकर, रेणूका जगताप, शालीनी वाघ, स्वाती केकान, शोभा उईके, अलका बानोकार आदीं उपस्थित होते.