शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला असुरक्षित, पोलीस कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:17 IST

जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे.

ठळक मुद्देसंगीता ठाकरे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे. एसटीच्या महिला वाहकावर चाकूहल्ला झाला, युवतीची छेडखानी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना, अ‍ॅसिड व चाकूहल्ले होत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठे तरी कमी पडत असल्याचा सवाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनातून केला आहे.अमरावती शहरात महिलाविषयक गुन्ह्यात वाढ झाली असून अमरावतीमधील महिला असुरक्षित आहेत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहे. पोलीस काही दिवस मोहीम राबवितात. मात्र, काही दिवसांतच पोलिसांकडून मोहीम गुंडाळली जात असल्याचा आरोप संगीता ठाकरेसह पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. महिलावरील अत्याचार वाढत गेले, तर महिलांना घरातून बाहेर निघणे कठीण होईल, नोकरी करणे किंवा बाहेरील कामे करणे बंद करावे लागेल, अशी स्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नसल्याचा आरोप संगीता ठाकरे यांनी केला. महिलासंबंधित अत्याचाराच्या कमी करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ व निरंतर कारवाई सुरू ठेवावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष सुचिता वनवे, संगिता देशमुख, कल्पना वानखडे, सारिका बोरकर, वंदना ठाकरे, ममता हुतके, राई देशमुख, सरला इंगळे, छाया कडू, नीलिमा कडू, माधुरी पोल्हाड, नीता वाटाणे, राजकन्या शिंंगराळे, सुषमा बर्वे, मनीषा कहाते आदी उपस्थित होते.शीतल पाटीलची हत्या करणाऱ्यांना अटक केव्हा?अमरावती : शीतल पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला आतापर्यंत का अटक करण्यात आली नाही, असा सवाल भीम आर्मीने पोलीस आयुक्तांना निवेदनातून बुधवारी केला. आरोपी मोकाट फिरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मीने सीपींकडे केली. यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष साठे, राहुल नाईक, शेख अकबर, राजेश वानखडे, मनोज वानखडे, बंटी रामटेके, अनंदा इंगळे, पवन शेंडे, कपील नाईक, उमेश मेश्राम, विक्की वानखेडे, प्रवीण बन्सोड, अभिजित गोंडाणे, प्रितम हिरे, अशोक नंदागवळी, शरद वाकोडे, प्रवीण गजभिये, राजेश भटकर, राहुल भालेराव आदी उपस्थित होते.