शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पावतीविना व्यवहार, काय करते ‘सहकार’

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली.

सावकारीचा गोरखधंदा : कुबडेचा अद्याप सुगावा नाहीअमरावती : सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली. मात्र, हा गैरप्रकार सुरू असताना सहकार संस्था करते तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय कुबडे अद्यापही पसार असून पोलिसांना त्याचा सुगावा लागलेला नाही. गांधी चौकातील कुबडे ज्वेलर्सने ६२० कर्जदार शेतकऱ्यांची यादी देण्यास विलंब केल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे याप्रतिष्ठानाचे प्रोप्रायटर विजय कुबडेविरूद्ध १२ जानेवारी रोजी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही अद्याप विजय कुबडेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. दरम्यान सातरगाव येथील रहिवासी मनीष जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये सावकारीचा व्यवसाय करणारे सावकार व्याजाचे पैसे घेऊनही ग्राहकांना पावती देत नसल्याचे सांगत आहेत.स्वतंत्र चौकशी व्हावीअमरावती : अशिक्षित व भोळेभाबडे शेतकरी सोने गहाण ठेवण्यासाठी सावकारांकडे जातात. मात्र, त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन हे सावकार त्यांची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट मत जाधव यांनी मांडले. कर्जमाफीच्या मुदतीनंतरही कुबडे ज्वेलर्सने कर्जदार शेतकऱ्यांकडून व्याजाचे पैसे घेतले. मात्र, या व्यवहाराची पावती त्यांना दिली नाही. असे प्रकार अनेक सावकारांकडे सुरू आहेत. याप्रकारावर जिल्हानिबंधकांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा तरूण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांना कुबडे ज्वेलर्समधून पावती देण्यात आली नाही. जिल्ह्यात असे हजारो सावकार कर्जवाटप करतात. यातून कित्येक शेतकऱ्यांची नाडवणूक होते. त्यांना न्याय देखील मिळत नाही. त्यामुळे अशा सावकारांचा हा गोरखधंदा उघड व्हायला हवा. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही शेतकरी मनीष जाधव यांनी केला आहे व कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी) वेगळा गुन्हा दाखल करावाभोळ्याभाबड्या व अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब तरुण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी सहकार संस्थेच्या निदर्शनास आणून दिली आहे. सावकारी व्यवसायातील विनापावतीचे कनेक्शन जाधव यांनी उघड केले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल करणे अपेक्षित ठरते. शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यकसावकारीफासात अडकलेल्या शेतकऱ्यांनी सावकारांविरुद्ध तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. मनीष जाधव या शेतकऱ्याने पहिले पाऊल टाकले असून जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनी संघटित होऊन अशा सावकारी गोरखधंद्याविरुद्ध एकजुटीने लढा उभारावा.