शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदुषणमुक्तीसाठी वन्यप्रेंमीचा पुढाकार, महापालिका निद्रीस्तच

By admin | Updated: October 23, 2016 00:31 IST

छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याने स्थंलातरित पक्ष्यांसह स्थानिक पक्षी प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

छत्री तलाव प्लॅस्टिकमय : ट्रक भरून प्लॅस्टिक कचरा गोळाअमरावती : छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याने स्थंलातरित पक्ष्यांसह स्थानिक पक्षी प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता तलाव स्वच्छ करण्याकरिता वन्यप्रेमींनीच पुढाकार घेतला आहे. शनिवारी शंभरावर वन्यप्रेमींनी प्लॅस्टिक ट्रकभर कचरा काढून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. वाढते शहरीकरण हे समृध्द जंगलासाठी संकट निर्माण करीत आहे. त्यातच नागरिक जलस्त्रोत प्रदूूषित करीत आहेत. देवी-देवतांच्या मूर्ती शिरविताना निर्माल्यासह प्लास्टिक कचरा तलावात फेकतात. प्लॅस्टिकच्या वाट्यासह अनेक वस्तु छत्री तलावात फेकण्यात आल्याने पाणी प्रदुषित झाले आहे. त्यामुळे वन्यप्राणी व पक्षांसाठी हे मोठे संकट निर्माण झाले आहे. तलाव स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, प्रशासनाची ही निगरगट्ट भूमिका वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतणारी आहे. छत्री तलाव प्लॅस्टिकमय झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच वन्यप्रेमींनी पुढाकार घेऊन शनिवारी सकाळी छत्री तलाव स्वच्छता अभियान राबविले. वन्यप्रेमी व पक्षी अभ्यासक यादव तरटे, मनोज बिंड, वैभव दलाल, शुभम सायंके, रोहन गुप्तासह एनएसएसच्या शभंरावर विद्यार्थ्यांनी तलावातील प्लॅस्टिक बाहेर काढून ट्रकभर कचरा गोळा केला आहे. यावेळी वनविभागाचे उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिना यांच्यासह वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर यांची उपस्थिती होती. तलावातील कचऱ्यासंदर्भात उपवनसरंक्षक मीना यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केलीे. त्यावर काही उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)