शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

वडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे.

रेलचेल वाढली : वन्यप्राणी गणनेसाठी वन्यप्रेंमीत उत्सुकतावैभव बाबरेकर अमरावतीवडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे. शहरालगतच्या जंगलात यंदा प्रथमच वन्यप्राणी गणना होत असल्यामुळे पानवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी वन्यप्रेंमीमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काही नैसर्गिक, तर कृत्रिम पाणवठ्यांवर अवलंबून राहावे लागते. पाणीस्त्रोत कमी झाल्याने पाणवठेच वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यंदा पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात तब्बल १५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाणवठ्याजवळ मचाण बांधून ही होणार आहे. प्रत्येक वन्यप्राण्याला २४ तासांतून एकदा पाणी प्यावेच लागते, त्यासाठी प्राणी हे पाणवठ्यावर जातात. प्राणी गणना करताना त्यांना त्रास न होता नोंदी घेणे अपेक्षित असते. या नोंदीवरून प्राणी प्रजातींच्या संख्येचा अंदाज येतो. यंदा मार्च महिन्याच्या अखेरच तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उन्हाच्या झळांनी मनुष्यासह वन्यप्राणीसुध्दा होरपळून निघालेत. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांनी पाणवठ्यांचा आधार घेतला आहे. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दररोज पानवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू असल्याची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद होत आहेत. कातलबोडीतील वाघ पोहरा-चिरोडी जंगलात वास्तव्यास असल्यामुळे ट्रॅप कॅमेऱ्यांवर दररोज मॉनिटरींग सुरू आहे. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.मचाणीवर रोमांचक अनुभव येणारपोहरा-चिरोडी जगंलात प्रथमच मचाण बांधून वन्यप्राण्यांची गणना होणार असून यादरम्यान वन्यप्रेंमीना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. २४ तास मचाणवर बसून वन्यप्राण्यांची गणना करताना कोणकोणते वन्यप्राणी पानवठ्यावर येतात, यांच्या नोंदी वन्यप्रेंमी घेणार असून यादरम्यान त्यांना विविध अनुभव येणार आहे. पोहरा-चिरोडी जंगलात १५ मचाणी बांधण्याचे काम सुरू आहे. १० मे रोजी पाणवठ्यावर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली आहे. - हेमंतकुमार मीणा, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभागपाणीस्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांना कृत्रिम पाणवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सद्यस्थितीत पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची मोठी रेलचेल सुरू झाली असून वन्यप्राणी गणनेत वन्यप्रेंमींना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. - स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक