शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भाषकांची अनेक राज्ये, मराठी माणसांची का नाहीत?

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या

अमरावती : देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची चळवळ गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.जनमंच लढा विदर्भाचा व विदर्भ माझा संघटनेच्यावतीने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आॅडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी ‘वेगळ्या विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावर जाहीर व्याख्यानात ते प्रमुख व्यक्त म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड तर प्रमुख अतिथी म्हणून अतुल यादगिरे, अरुण वरणगावकर, बबन बेलसरे, अतुल गायगोले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना, श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत हेतुपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहे. ‘जय विदर्भ’ म्हटले तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा म्हणून संबोधले जाते, मात्र ‘जय महाराष्ट्र ’ म्हटले तर देशविरोधी होते काय, असा सवाल उपस्थितांच्या पुढ्यात ठेवला. अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य, गोंड राजे, सीपी अ‍ॅन्ड बेरार, ब्रिटीशांचा कार्यकाळ, इंडियन नॅशनल कॉंग्रेस, अकोला करार, राज्य घटनेमध्ये विदर्भाविषयी तरतूद, अनुशेषाची टोलवाटोलवी, विदर्भ राज्य निर्मितीबाबत कमिशन नेमण्याचा फार्स, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची फसवेगिरी, असा इतिहास उलगडला. राज्यपालांना अनुशेष भरण्याचे विशेष अधिकार असताना राज्यकर्त्यांनी या अधिकाराला कशी बगल दिली, हे उदाहरणानिशी पटवून सांगितले. वेगळ्या विदर्भाशिवाय विकास नाही, त्यामुळे आता जय विदर्भाचा हुंकार पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.