शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

एसटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By admin | Updated: August 27, 2015 00:34 IST

बेजबाबदारपणे एसटी बस दामटून निर्दोष साहिलचा बळी घेणाऱ्या चालक आणि वाहकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

गावकऱ्यांचा संतप्त सवाल : पोलिसांविरूध्द रोष कायमचवैभव बाबरेकर अमरावतीबेजबाबदारपणे एसटी बस दामटून निर्दोष साहिलचा बळी घेणाऱ्या चालक आणि वाहकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मृत साहिल व त्याचा मोठा भाऊ हृतिक हे दोघेही अमरावती येथे शाळेत जाण्यासाठी मंगळवारी सकाळी माहुली येथील चौकात बसगाडीची प्रतीक्षा करीत होते. सकाळी ६.४५ वाजता मोर्शी-बुलडाणा ही बस माहुलीत आली आणि मुख्य मार्गावरच थांबली. बस सुरु असतानाच वाहकाने प्रवासी घेण्यास सुरूवात केली. अन्य प्रवाशांच्या गर्दीत चिमुकला साहिल बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, गर्दीमुळे साहिल मागे राहून गेला. शेवटून बसगाडीत चढत असताना अचानक बसगाडी धावू लागल्याने साहिल पाय घसरून खाली पडला. चालकाचा बेंजबाबदारपणा भोवलाअमरावती : उपस्थितांनी आरडाओरड केली. हा गोंधळ चालक आणि वाहकाच्या कानावरही गेला. मात्र, निर्ढावलेल्या वाहकाने तरीही ‘डबल बेल’ दिली आणि चालकाला गाडी दामटण्याची सूूचना केली. यामुळेच साहिल एसटीच्या मागच्या चाकात चिरडला गेला, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. काय म्हणतात नियम ?मुळात बसगाडी भररस्त्यावर उभीच करू नये. प्रवासी बसगाडीत चढत असताना बसगाडीचे इंजिन बंदच असावे. वाहकाने चढणाऱ्या प्रवाशांकडे जातीने लक्ष द्यावे. चढताना झुंबड होणार नाही यासाठीचा कटाक्ष बाळगावा. ज्या प्रवाशांना जसे- वयोवृध्द, अपंग नागरिक वा लहान मुले गरज भासेल त्यांना वाहकाने बसगाडीत चढण्यासाठी मदत करणे हे वाहकाचे कर्तव्यच आहे. संपूर्ण प्रवासी बसगाडीत सुरक्षितपणे चढल्याची खातरजमा झाल्यानंतर वाहनाचे प्रवेशद्वार दोन्ही कुलुपांचा वापर करून वाहकाने बंद करायला हवे. त्यानंतरच बसगाडी हाकण्यासाठीची घंटा वाजवायला हवी. चालकानेदेखील बस हाकताना दरवाजा बंद केला की कसे, याची खातरजमा करायलाच हवी. या घटनेत वाहक आणि चालकांनी या सर्वच नियमावलीचे जाणिवपूर्वकरित्या उल्लंघन केले. अशा कृत्यामुळे चढणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू होऊ शकतो याची पुरेपुर कल्पना असतानाही केलेले हे कृत्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच ठरतो.