शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

इवल्या इवल्या पक्ष्यांच्या वेदना रोखणार कोण?

By admin | Updated: July 14, 2016 00:16 IST

घराची शोभा वाढविण्यासाठी पक्ष्यांना कैद करून पालनपोषण करण्याची पध्दत अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही : शहरात सर्रासपणे विदेशी पक्ष्यांची विक्री, बहुतांश घरी पोपट वैभव बाबरेकर अमरावती घराची शोभा वाढविण्यासाठी पक्ष्यांना कैद करून पालनपोषण करण्याची पध्दत अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या देशी-विदेशी पक्षांची शहरात सर्रास विक्री होत आहे. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच शहरात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या इवल्याशा मुक्या जिवांच्या वेदना कधी संपणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गगणात भरारी घेणारे हे पक्षी घराची शोभा वाढविण्यासाठी बंदीस्त केले जातात. शहरातील अनेक घरांमध्ये पिंजऱ्यात कैद असलेले विविध प्रजातीचे पक्षी आढळून येत आहे. या विदेशी पक्ष्यांची विक्री करण्याची परवानगी कोण देते, याबाबत वनविभाग सुध्दा अनभिज्ञ आहे. त्यामुळे पक्षी विक्रेते बिनधास्तपणे शहरात पक्ष्यांची विक्री करीत आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पक्षी संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाते. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार काही पक्षी प्रजातीची विक्री करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रजातीच्या पक्षांची विक्री करता येत नाही. मात्र, शहरातील काही ठिकाणी सर्रासपणे पक्ष्यांची विक्री होत आहे. पक्षी विक्रीसंदर्भात संबधित विक्रेत्यांची चौकशी करण्याचे अधिकारी वनविभागाकडे आहेत. मात्र, तरीसुध्दा या विक्रेत्यांकडे पक्षी विक्रीसंदर्भात काही दस्ताऐवज आहे किंवा नाही, याची शहानिशासुध्दा वनविभाग करीत नाही. या आकर्षक पक्षांची खुलेआम विक्री होत असल्यामुळे नागरिकांनीही पक्षी खरेदीची ओढ लागली आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव सरंक्षण कायद्याच्या अनुसूची यादीत असलेला पोपट हा पक्षी बहुतांश नागरिकांच्या घरातील पिंजऱ्यात आढळून येतात. मात्र, आजपर्यंत या पक्षाविषयी एकही कारवाई वनविभागाने केली नाही. या इवल्याशा जीवांंना बंदीस्त करून त्यांची हेडसांड केली जाते. काही प्रसंगी नागरिक या पक्षांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष सुध्दा करतात. अनेकदा बंदीस्त असलेले हे पक्षी पिंजऱ्यातच मृत्यूमुखी पडतात. अनेक जण बाहेरगावी जातात, अशावेळी पक्षांची काळजी घेणारे घरात कोणीच राहत नाही. अशाप्रसंगी अन्न-पाण्याविना हे पक्षी दगावतात. शहरात सर्रारपणे हा प्रकार घडत आहे. मात्र, याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. पक्षीप्रेमी म्हणतात स्थानिक पक्षी प्रजातीला धोका शहरात देश-विदेशातील पक्ष्यांची विक्री होत असल्यामुळे हे स्थानिक प्रजातीला धोकादायक ठरू शकते, असे मत पक्षी अभ्यासकांचे आहे. एखाद्या पक्षी प्रजातीच्या आजार स्थानिक पक्षांना संसर्ग करू शकतो, तसेच एखाद्या पक्ष्यांची संख्या वाढल्यास स्थानिक प्रजातीच्या पक्षाच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, असे पक्षीप्रेमी व अभ्यासकांचे मत आहे. वनविभागाने केले हातवर लवबर्ड, क्राकटील पॅराट व पिन्चेस या पक्ष्यांची शहरात सर्रास विक्री होत आहे, यासंदर्भात 'लोकमत'ने वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता हे पक्षी वन्यजीव सरंक्षण कायद्याच्या अनुसूची यादीत येत नसल्याचे सांगून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले. घरोघरी पिंजऱ्यात पोपट भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ अतंर्गत अनुसूची १ व २ मध्ये येणारा पोपट हा पक्षी सहजरित्या नागरिकांच्या घरातील पिंजऱ्यात आढळून येतो. वास्तविक पाहता पोपटला पिंजऱ्यात कैद करून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. याकडे वनविभागाने पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. बहुतांश नागरिक पोपट पाळतात. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई का करण्यात आली नाही, हे विशेष. मग, कारवाईचे अधिकार कोणाला हे पक्षी भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची यादीत नाही, त्यामुळे या पक्षांच्या विक्रीसंदर्भात वनविभाग कारवाई करू शकत नाही, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंदर्भात कारवाईचे अधिकार कोणाला ?