शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

सार्वजनिक समस्या सोडविणार कोण?

By admin | Updated: August 2, 2015 00:33 IST

साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी ...

लोकप्रतिनिधींची अनास्था : धुळीस मिळाले साखर कारखान्याचे स्वप्नअंजनगाव सुर्जी : साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी तालुका अजूनही सार्वजनिक समस्यांच्या समाधानासाठी योग्य नेत्याची वाट पाहत आहे. अकोट, दर्यापूर व परतवाडा या तीनही शहरांच्या मध्यभागी तीस किलोमीटरच्या समान अंतरावर असलेले अंजनगाव सुर्जी आजही एसटी आगारापासून वंचित आहे. दररोज शंभरच्यावर बसफेऱ्या येथून लांब पल्ल्याच्या गावांपर्यंत जातात. अमरावती व अकोला मार्गावर भारी वाहतूक असून एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहनेसुध्दा प्रवाशांनी खचून भरलेली असतात. खेडे पाड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना एसटी पासेससाठी ताटकळावे लागते. प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंंबून रहावे लागते. घरी लग्न समारंभ असला तर विनाकारण आजूबाजूच्या डेपोचे जाण्यायेण्याचे साठ किलोमिटरचे एसटीचे भाडे भरावे लागते. पन्नास वर्षे उलटूनसुध्दा एकाही आमदाराला ही समस्या सोडविता आली नाही. अंबादेवी साखर कारखान्याचे स्वप्न आता माती मोल झाले आहे. काळी कसदार शेती, सिंचनाच्या सोयी व उसाचे भरघोस उत्पन्नाची हमी असलेल्या तालुक्यात मोठ्या थाटामाटाने उभारलेला अंबा साखर कारखाना राजकीय हेवेदाव्यांमुळे कायमचा बुडाला आहेत. ज्या शिखर बँकेने हा कारखाना अवसायनात काढून विकला त्या घेणाऱ्या कंपनीचे नाव आणि कार्यालय रहस्यमय आहे आणि दिलेल्या मुंबईच्या पत्त्यावर कंपनीचे कार्यालय बेपत्ता आहे. येथील ग्रामीण रुग्णालय स्थापनेपासूनच समस्याग्रस्त असून केवळ तीस खाटांच्या भरवश्यावर आणि अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आधारे आपले दिवस काढत आहेत. गावाच्या परिसरात एखादा मोठा अपघात झाला किंवा कुणी व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याला येथे कोणत्याच सुविधा नाहीत. जिल्ह्याचे ठिकाणी नेताना अनेक गंभीर व्यक्ती रस्त्यातच दगावल्या आहेत. मृत महिलांच्या शव विच्छेदनासाठी अथवा महिला वर्गाच्या शस्त्रक्रियेसाठी येथे महिला डॉक्टर उपलब्ध नसून वेळप्रसंगी खासगी महिला डॉक्टराला अथवा आजुबाजूच्या तालुक्यातून महिला डॉक्टरला बोलवावे लागते. उपजिल्हा रुग्णालयासाठी येथील ग्रामीण रुग्णालय आतुरतेने प्रतीक्षेत आहे.