परतवाडा : जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदीस असलेल्या कर्मचाऱ्यांजवळ कोरोना तपासणी अँटिजेन
किट उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. परराज्यातून कोण निगेटिव्ह कोण पॉझिटिव तपासणार कोण असा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा जीव मात्र टांगणीला लावण्यात आल्याचे चित्र आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हा सीमेवरून मध्यप्रदेशात जाणाऱ्या मार्गांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीजवळ कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर त्याला प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. दुसरीकडे याच नाक्यांवर कोरोना अँटिजेन टेस्टकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्याचे आदेश आहे. परंतु मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातून भैसदेही, बैतुलकडे जाणाऱ्या डोमा येथील वनविभागाच्या नाक्यावर आरोग्य कर्मचारी नसल्याचे उघड झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर केवळ पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावयाला सुरुवात केली आहे. राहुटी टाकून कर्मचारी तैनात आहेत.
बॉक्स
पोलिसांवर जबाबदारी
मध्यप्रदेशात जाणाऱ्या रस्त्यांवरील नाक्यावर पोलीस पथक, आरोग्य कर्मचारी व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणीसाठी आवश्यक असलेली अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध नसल्याने आरोग्य कर्मचारी तेथे तैनात ठेवण्यात आले नाहीत.
कोट
कोरोना तपासण्यांसाठी आवश्यक असलेली अँटिजेन किट उपलब्ध नसल्याने कर्मचारी तेथे तैनात ठेवण्यात आले नाही.
- सतीश प्रधान,
तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा