शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनालाही कळेना अधिकृत पार्किंग कुठली ?

By admin | Updated: May 19, 2017 00:38 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत पार्किंगस्थळ कुठले, याची माहिती खुद्द जिल्हा प्रशासनालाही नसून

नझूल विभागाकडून मागविली माहिती : ‘नो पार्किंग’मध्ये वाहनांच्या रांगा लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत पार्किंगस्थळ कुठले, याची माहिती खुद्द जिल्हा प्रशासनालाही नसून ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन आरडीसी रामदास सिद्धभट्टी यांनी येथील पार्किंगच्या नेमक्या जागेसंदर्भात माहिती मागविली आहे. तसेच वाहने ठेवण्यासाठी टिनाचे शेड बांधून द्यावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येणार आहे. गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे मुख्यालयी उपस्थित नव्हते. याप्रकरणी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांसाठी अधिकृत पार्किंग झोन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीत जेथे नागरिक व कर्मचारी वाहने उभी करतात, ती जागा अधिकृत पार्किंगस्थळ आहे की कसे, याबाबतची माहिती रामदास सिद्धभट्टी यांनी नझूल विभागाकडून मागविली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची धास्ती व आरडीसींनी बजावलेल्या नोटीसच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी त्यांची वाहने गुरूवारी शिस्तीत लावलेली दिसून आलीत. रोजगार हमी योजना, निवडणूक विभाग व खनिकर्म विभागच्या प्रवेशव्दारावजळ एकही वाहन दिसून आले नाही. मात्र, येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचा पसारा तसाच अस्तव्यस्त आढळून आला. ‘नो- पार्किंग’च्या फलकांच्या खालील स्थिती ‘जैसे- थे’ असून येथे नियमबाह्य पार्किंग अद्यापही कायम आहे. या वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा केव्हा उगारणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु अधिकृत पार्किंगस्थळ निश्चित केल्यानंतरच पोलिसांना सांगून कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंग स्थळाची नेमकी माहिती तेथीलच कर्मचाऱ्यांनादेखील नसावी. त्यामुळे हा सावळा गोंधळ होत आहे. या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व विविध कामानिमित्त येणारे नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करून दररोज नियमांचे उल्लंघन करीत होते. याप्रकाराला तातडीने आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ‘लोकमत’ने हा प्रश्न लोकदरबारात मांडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकृत पार्किंग झोन झाल्यास आपसुकच अनधिकृत पार्किंगला आळा बसणार आहे. त्यामुळे या दिशने हालचाली आता वेगाने सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र अधिकृत पार्किंगची माहिती नझूल विभागाला आरडीसींनी मागितली आहे. पश्चात वाहने ठेवण्यासाठी टिनाचे शेड बांधून देण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांची वाहने अधिकृत पार्किंगमध्ये सुरक्षित राहतील. नागरिकांच्या वाहनांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. परिसरात अधिकृत पार्किंग व्यवस्थेसाठी नझूल विभागाकडून माहिती मागविली. लवकरच अधिकृत पार्किंग स्थळ तयार करण्यात येईल. शेड बांधकामासाठी सा.बां.विभागाला पत्र देण्यात येईल. - रामदास सिद्दभट्टी, आरडीसी