शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठी घरे कुठे? ८०० अमरावतीकरांचे घरांचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली.

ठळक मुद्देराज्यात अव्वल प्रकल्पाचे बोचरे वास्तव

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कामाच्या प्रगतीमुळे राज्यात अव्वल ठरलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घटक तीनमधील बोचरी बाजू आता समोर आली आहे. यामुळे ८०० अमरावतीकरांच्या घरांचे स्वप्न झाल्यागत स्थिती निर्माण झाली. या योजनेत मुख्य कंत्राटदारांने नेमलेल्या दुसऱ्या व त्याने सबकॉन्ट्रक्ट दिलेल्या अर्धा डझन कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने महापालिकेची गोची झाल्याचे वास्तव आहे.योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली. दरम्यान म्हसला येथील ६० सदनिकांचेच काम पूर्ण होऊ शकले. अन्य सहा कामे प्रलंबित असल्याने प्रकल्प कालावधीत ते पूर्ण होणार की नाही, याविषयी महापालिका प्रशासनात दुमत आहे. या प्रकल्पाला कोविड कालावधीमुळे ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी नागपूरच्या सब कॉन्ट्रॅक्टरने पुन्हा सहा सबकॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, नागपूरच्या कॉन्ट्रॅक्टरने इतरांचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी कामे थांबविली आहेत. प्रकल्पातील सावळा गोंघळामुळे ४०० वर नागरिकांनी त्यांचा प्रत्येकी ४९ हजारांचा डीडी परत घेतल्याने या योजनेला घरघर लागल्याची स्थिती आहे.

चार मजली इमारती, ३० चौ.मी. चटई क्षेत्रया प्रकल्पात ८६० सदनिकांसाठी १४ भूखंडावर चार मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक सदनिकेचे चटई क्षेत्र हे ३० चौ. मीटरचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांना ४९ हजारांचा डीडी महापालिकेकडे जमा करावा लागला व ड्राॅ पद्धतीनंतर नागरिकांना घराची खरेदी करून देण्यात येत आहे. तत्पूर्वी त्यांना सदनिकेचा हप्ता सहा समान किश्तीत जमा करावा लागणार आहे.

१ जानेवारीपासून दंडात्मक कारवाईया कामांच्या दिरंगाईबाबत मुंबई येथील संबंधित एजन्सीला आतापर्यंत २० मार्च २०२०,  २० जुलै २०२०व २५ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेने नोटीस बजावली आहे. आता १ जानेवारी २०२२ पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंत्राटदाराचा कुठलाच मुलाहिजा केला जाणार नसल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सबकंत्राटदारांनी थांबविले काममुख्य कंत्राटदारांला देयक मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या कंत्राटदारांना संबंधित निधी दिल्याची माहिती आहे. मात्र, या कंत्राटदाराने नेमलेल्या सहा कंत्राटदारांना बिले देण्यात न आल्यामुळे त्यांनी कामे थांबविल्याचे सांगण्यात आले. यात रहाटगाव येथील भूखंडावर कामांसाठी खड्डे खोदण्यात आल्याने लगतची घरे धोक्यात आल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना