शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सूत्रधाराला अटक केव्हा?

By admin | Updated: January 31, 2015 01:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा मुख्य सूत्रधार राजेश पडोळे हा तिवसा पोलिसांना गवसलाच नाही. त्याला एक, दोन व्यतिरिक्त कोणी पाहिलेच नसल्याने त्याचा शोध घेऊन अटक करणे तिवसा पोलिसांना आव्हान ठरले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या राजीव गांधी ग्राम विमा योजनेच्या नावे तिवसा तालुक्यामधील किमान १५ ग्रामपंचायतीमधील शेकडो नागरिकांना गंडविण्यात आले. १०० रूपयात १ लाखाची विमा पॉलिसी असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, शासनाची राजमुद्रा अंकित असणारी पावती देण्यात येत असल्याने विश्वास बसला व ईथेच त्यांची फसगत झाली. प्रकरणात भांबोरा ग्रामपंचायतीचा शिपाई गणेश गवळी याला तिवसा पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे याच्या मागावर पोलीस आहे. त्याला फार कमी लोकांनी पाहिले असल्याने व त्याचा पत्तादेखील कुणाला माहीत नसल्याने पोलीस तपासातील अडचणी वाढत आहेत. दरम्यान शुक्रवारी भांबोरा ग्रामपंचायतीचे सरपंच काळमेघ यांचे तिवसा पोलिसांनी बयाण नोंदविले. तसेच ग्रामसेवक बांते यालादेखील चौकशीसाठी बोलाविण्यात येऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकारी तेलंग यांनी सांगितले. चपराशाने परिपत्रक आणून दिले त्यावरून ठराव घेण्यात आला, असे ग्रामसेवकाने सांगितले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तेलंग म्हणाले.शासनाची राजमुद्रा, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र, ग्रामपंचायतने शासकीय योजना म्हणून ग्रामपंचायतने घेतलेला ठराव, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचाच चपराशी काढत असलेली विमा पॉलिशी यावर विश्वास बसत भांबोरा, अमदाबाद, पालवाडी येथील शेकडो नागरिकांनी अस्तित्वात नसलेल्याच राजीव गांधी ग्राम विमा योजना, जीवनदायी ग्राम विमा योजनेच्या पॉलिसी काढल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)