शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई केव्हा ?

By admin | Updated: July 17, 2016 00:10 IST

अनेक वर्षांपासून नोकरीत असलेले शिक्षकच शिकवणी वर्ग घेत आहेत.

अवैध शिकवणी वर्ग सुरूच : अधिकारी की बघे ?अमरावती : अनेक वर्षांपासून नोकरीत असलेले शिक्षकच शिकवणी वर्ग घेत आहेत. त्यामुळे पालकांची आर्थिक लूट होत आहे. हे शिक्षक शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची पायमल्ली करीत असून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी.आर.राठोड केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकाऱ्यांना कारवार्इंचे अधिकार असतानाही कारवाई होत नाही. त्यामुळे अधिकारी झोपेत आहेत का, असा प्रश्न उपस्थिीत होत आहे. अमरावती जिल्हयात ४०० पेक्षा जास्त शिकवणी वर्ग आहे. काही शिकवणी वर्ग ही खासगी शिक्षकांची आहेत. अनेक शासकीय शिक्षकांनीच विद्यादानाच्या नावावर खासगी दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे अश्या शिक्षकांच्या शिकवणी वर्गावर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहेत. इयत्ता १० वी १२ हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा र्टनिंग पाँईट असतो. त्यामुळे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखेचे सर्वच विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. १२ वीच्या परीक्षेत प्रात्यक्षिक परीक्षेत गुण टाकणे संबंधित विषय शिक्षकांच्या हातातच असते. त्यामुळे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेत आपल्याला जास्त गुण मिळावे ते कमी पडू नये, याकरिता त्यांच्याकडेच शिकवणी वर्ग लावतात. या कारणानेच हा अवैध शिक्षणराज फोफावला आहे. यातूनच अनेक शिक्षक हे शिक्षणसम्राट झाले आहे. ते स्वत: तर त्यांच्यकडे असलेल्या विषयाची शिकवणी वर्ग घेतातच पण त्यांनी आपली खाजगी शिकवणी वर्गांची दुकानदारी थाटून इतरही शिक्षकांना यामध्ये समाविष्ट करुन घेतात. त्यांच्याकडूनही त्यांना विद्यार्थी देण्याचे कमीशन घेतल्या जाते. हा प्रकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना महिती नसते. जर विद्यार्थ्यांना कुठलाही फक्त एकच विषय लावायचा असेल तर त्याच मनाई केली जाते. इयत्ता १२ वी साठी, यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र या विषयाचा समावेश राहतो. खासगी शिकवणी वर्गाचे संचालक चारही विषयाचा ग्रुप स्थापन करतात सर्व विषय आमच्याकडे लावा, असे बंधनकारक केले जाते. यातूनच लाखोरुपये छापण्याचा गोरखधंदा सुरु होतो. हा प्रकार दिवसादिवस वाढतच जात आहे. इयत्ता ११ वीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला की त्याला वर्षभराचे शुल्क सुरुवातीलाच भराला भाग पाळण्यात येते. त्यामुळे पालकानाही आर्थीक भुर्दंड सहन करावा लागतो. अशाप्रकरे अमरावतीत हा प्रकार कुठे चालतो हे पाहण्याची साधी तसदीही घेण्यात आली नाही. यासंदर्भात सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण विभागाला अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. पण कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष! (प्रतिनिधी)हमीपत्राचे होते तरी काय ? आमच्या शाळेत कुणीही खासगी शिकवणी वर्ग घेत नाही, असे सर्व शिक्षकांकडून हमीपत्र भरून घेतले जाते. मात्र याची अंमलबजावणी होत नाही. जर नोकरीत असतानाही कुणी शिकवणी वर्ग घेत असेल तर शाळा प्रशासनही त्यांना समज देऊ शकते. गेल्या वर्षी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड यांनी शाळांना पत्र पाठवून अश्या शिक्षकांचे हमीपत्र शिक्षणविभागाला पाठविण्याचे आदेश दिले होते. यानंतर माशी कुठे शिंक ली, हे कळलेच नाही.