शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी संत्राबागा जगवाव्यात कशा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:17 IST

यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत.

ठळक मुद्देउत्पादकांचा सवाल : शासन करणार काय २००३ ची पुनरावृत्ती?

आॅनलाईन लोकमतनेरपिंगळाई : यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत. यामुळे संत्रा बागा कशा जगवायच्या, या विवंचनेत संत्रा बागायतदार शेतकरी आहेत.यावर्षीसुद्धा पावसाची नोंद मोर्शी येथे तालुक्याच्या ठिकाणी घेतली गेली. परंतु, तेथून दोन किलोमीटर अंतरावरच तळणी ते गोराळा शिवारापर्यंतच्या अंदाजे २० ते २५ किलोमीटर परिसरात अत्यल्प पाऊस पडला. पर्यायाने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. अजून उन्हाळा यायचाच, तर रब्बीची पिके कशी काढावी आणि मुख्यत्वे संत्रा बागा कशा जगवाव्यात, या विवंचनेत येथील शेतकरी आहे.यावर्षी २००३ पेक्षाही भीषण दुष्काळ परिस्थिती असल्याने तसेच परिसरातील बराचसा भाग ड्राय झोनमध्ये असल्याने बोअरवेल (कुपविहीर) करता येत नाही. तेव्हा संत्रा बागायतदार शेतकरी संत्रा बागा कशा जगविणार, या विवंचनेत आहेत.तेव्हा मिळाले होते सिंचनासाठी पाणी, अनुदान२००३ मध्ये तत्कालीन शासनाने अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक क्षेत्रात आलेल्या पाइप लाइनमधून शेतकºयांना संत्राबागांकरिता पाणी देण्यात आले होते. याकरिता सावरखेड येथे पाणी वापर संस्थेची निर्मिती करून त्या माध्यमातून संत्रा बागा जगविण्याकरिता शेतकºयांना पाणी देण्यात आले होते. पाण्याअभावी वाळलेल्या संत्रा झाडांकरिता १२५ रुपये प्रतिझाड याप्रमाणे ८० झाडांसाठी एकूण ९०४३ शेतकºयांना ६ कोटी ८५ लाख ६१ हजार ८७५ रुपये अनुदान सरकारतर्फे देण्यात आले होते.संत्रा बागा जगविण्याकरिता सरकारने सन २००३ प्रमाणेच अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीला नेलेल्या पाइप लाईनवरून पाणीपुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा. वाटल्यास त्या पाण्याचे योग्य भाडे घ्यावे.- धनंजय तट्टे, संचालक, मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समिती